Skip to main content

मुक्तक

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो.

राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
कामाने कृष्णाची तपस्या भंग करण्यासाठी राधेस पाठवले पण कृष्णाच्या तपस्येच्या अनुभूतीने राधाच तपस्वी झाली सोडवण्यास गेलेला कामही तपस्वी होऊन कृष्णराधेच्या प्रणय तपस्येस शरण गेला राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत गाऊ लागला
काव्यरस

तारुण्य पुन्हा जगताना

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गीत गाऊन रितं होताना विवेक प्रगल्भ निर क्षीर होताना तारुण्यातला अनुभव पुन्हा जगताना रितेपण अधिक मोकळेपणाने भरुन काढताना नेमकं कोण कोण तरुण होत ? कवि, कविचे अनुभव भावना प्रेरणा नी कल्पना की वाचकाची अनुभूती ?
काव्यरस

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

वो शाम...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 02/03/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात.. मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात! पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?? आणि म्हणे "आरामात बसू"! 2 पाणीचं होतं की अजून काही?

शुभ सकाळ!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 01/03/2020 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळुहळू रुपेरी झाक घेऊ लागलंय, आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो.

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

लेखक माहितगार यांनी बुधवार, 19/02/2020 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

गणित..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 19/02/2020 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशी ओलांडली की जगण्याचं गणित थोडं सोपं होतं. करिअरचा दुभाजक पार केलेला असतो. बायकोमुळे अपूर्णांकाचा पूर्णांक झालेला असतो. घरातले लसावि, मसावि होत असतात. नाकावर चाळिशी आणि नाकासमोर सरssळ रस्ता असं एकरेषीय समीकरण असताना अचानक .. प्रमेय बनून ती येते. सुरवातीचं अवघडलेलं अनोळखीपण गेलं की जाणवतं ते "मी"पणा दशांशानेही नसलेलं तिचं निर्मळपण. खाचाखोचा नसलेलं निरागस, प्रसन्न हास्य.. वाहता दहाचा पाढा जणू! रुढार्थाने ती सुंदर असेलच असं नाही; पण तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमर्याद सुंदर ...

परकीमिलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/02/2020 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा