ओढ समुद्राची
ओढ समुद्राची
आमच्या चिपळूण पासून समुद्र तसा लांबच. म्हणजे समुद्र बघायला जायचं तर जवळच्या जवळ म्हणजे गुहागर गाठायला हवं. नाहीतर जरा लांब रत्नागिरी किंवा दापोली जवळचे बीच. त्यामुळे लहानपणी समुद्रावर जाणं खूपच कमी होतं. हां पण ओढ मात्र नक्की होती. लहान असताना आमच्या बिल्डिंग मधले शेजारी एखाद्या शनिवारी त्यांच्या मुलीबरोबर मलादेखील घेऊन जायचे. दोन तीन तास समुद्रावर घालवल्यावर त्यांच्या गाडीतून येताना दमून सॉलिड झोप लागायची. वर्षातून साधारण एकदा आमची कौटुंबिक म्हणजेच आम्ही चौघे आणि अप्पा काकांचं कुटुंब, ते चौघे असे आमच्या कुलदैवताला जायचो.
मिसळपाव