एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बरेच दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच्
तुझी आठवण सांजवेळी,
मन माझे कातर करते |
हुदयातुन पुढे सरकत,
वेळीअवेळी डोळ्यात दाटते ||
पोटपाण्याच्या नित्यक्रमात,
काही तास निघुनही जातात |
कामाच्या गडबडगोंधळात,
काहि आठवणी विझुन जातात ||
दुपारच्या गडबडी नंतर,
संथ झुलत संध्याकाळ येते |
परत एकदा स्म्रुती जागवुन,
भावनांच्या म्रुगजळात नेते ||
पुन्हा मन पेटुन उठतं,
समंधालाही उधाण येतं |
चंद्र येतो सोबतिला अन्,
झुळुक वार्याची मंद वाहते ||
या मंद वार्याबरोबर,
आठवणीही कुंद होतात |
मला एकटाल्याच सोडुन,
कुठल्याकुठे वाहुन जातात ||
थोडे दिवस पुन्हा