Skip to main content

माझ्याच त-हा

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच त-हा =========================== . . सांभाळलेला गारवा.. सांभाळलेला झरा.. अन तो सांभाळलेला कवडसा.. नाहीच मुळी मजहून वेगळा. . मीच गारवा मीच झरा. ऊन कवडसे माझ्याच त-हा!! अवखळ वेल्हाळ धबधबा लागला आता सपाटीला. . खंडी खंडी गाळतळा माझ्याच मी दाबला. एक प्रवाह अन किती धारा.. ओळखेना माझॆ मला!! . तो पहिला वेगळा माझा थेंब कोणता?...... . . ========================== स्वाती फडणीस...................... २००७
लेखनविषय:

वाचने 1875
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

खंडी खंडी गाळतळा माझ्याच मी दाबला. एक प्रवाह अन किती धारा.. ओळखेना माझॆ मला!! सुंदर.. :)

मीच गारवा मीच झरा. ऊन कवडसे माझ्याच त-हा!!
कविता आवडली.. अजूक एखादे रुपकात्म कडवे असते तर और मजा आता! -(गोंधळलेला) ऋषिकेश