Skip to main content

असेच काहीतरी

लेखक चेतन यांनी मंगळवार, 02/12/2008 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
एक असाच काहीतरी अस्पष्ट विचार बरेच दिवस मनात चालला होता आज तो लिहुन काढला एव्हढच् तुझी आठवण सांजवेळी, मन माझे कातर करते | हुदयातुन पुढे सरकत, वेळीअवेळी डोळ्यात दाटते || पोटपाण्याच्या नित्यक्रमात, काही तास निघुनही जातात | कामाच्या गडबडगोंधळात, काहि आठवणी विझुन जातात || दुपारच्या गडबडी नंतर, संथ झुलत संध्याकाळ येते | परत एकदा स्म्रुती जागवुन, भावनांच्या म्रुगजळात नेते || पुन्हा मन पेटुन उठतं, समंधालाही उधाण येतं | चंद्र येतो सोबतिला अन्, झुळुक वार्‍याची मंद वाहते || या मंद वार्‍याबरोबर, आठवणीही कुंद होतात | मला एकटाल्याच सोडुन, कुठल्याकुठे वाहुन जातात || थोडे दिवस पुन्हा शांतता, मिळत नाही कामातुन वेळ | मोकळे झाल्यावर परत एकदा दाटुन येते कातरवेळ || आठवणिंचा खेळ सारा, येते भरती ओहोटी | किनारे किती झिजावे, बांधाची खरी कसोटी || लाटांच्या या मुक्त माराने, किनारे टोकदार होतात | थोडासा जरी धक्का लागला, हातपाय कापत नेतात || संकटांची सोडून चींता, सोडुन उधाणाची भिती || काढून टाक संरक्षक भिंत, मिसळून जा लाटेसमती || सोडणार नाहीत आठवणी तुला, परत येतील लाटेवरती | अथांग मनाच्या सागरात, क्वचित मिळतात माणिकमोती || येत राहते भरती ओहोटी, पुन्हा गर्जून फेसाळ्ण्यासाठी | वळुन मागे पाहता दिसतील, कडूगोड आठवणगाठी || येइल परत पुन्हा संध्याकाळ, आठवणिंना घेउन संगे | मुक्त करुनी आठवणगाठी, सोडुन दे त्या वार्‍यासंगे || चेतन
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1358
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया