Skip to main content

मुक्तक

निर्बलता

लेखक शिवापा यांनी शुक्रवार, 27/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी स्पष्ट आठवते. टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे. तुझा हात, विस्कटलेले केस ओलेते डोळे अणि तापलेले श्वास. काही क्षणांचा प्रवास. दरम्यानचे वाढलेले अंतर मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा. पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे. आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या आंब्याच्या डहाळीला. हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल. पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते. परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर. मग विशाद वाटतो. किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.

पुण्य स्मरण

लेखक मेथांबा यांनी मंगळवार, 24/02/2009 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
साने गुरुजी खुप भाउक माणुस. गरिबांचं दु:ख बघवलं नाही म्हणुन त्यानी आत्महत्या केली. मी कधीही त्यांचं आता उठवु सारे रान एैकलं की मला त्यांची आठवण येते.

तहान

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
हं... इथे खण.... खणत रहा ...हा भूतकाळ आहे .... तो तुला खणायचाय... खणताना निघतील अवशेष आठवणिन्चे... यशाचे .. चुकांचे... हवेसे... नकोसे लक्षात ठेव, .... अवशेषामधे मन गुंतवायचं नसतं.....! पुढे लागतील थडगी, सोडून गेलेल्या आप्तांची... दगलबाज मित्रांची, लक्षात ठेव, ... थडग्यांपुढे फुलेच ठेवायची..... मन नाही ! खण .... खणत रहा ...... खणता खणता संपेल सारं .. थकून पाहशील अवती भवती .. .... तहानलायस ..! उतर .. या खोल भूतकाळाच्या गाभा-यात .. शोध मूळ जाणीवेचा निर्मळ झरा.. आता या झ-यालाच वर्तमानकाळ बनव अन् पडून रहा, ... या झ-याकाठी .. निपचित ...! -- सागरलहरी
Taxonomy upgrade extras

तुझा सूर्य मला उसना दे !

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 22/02/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यागता तुझा सूर्य मला उसना दे, खरंय की, तूच वाट चुकलेल्या पान्थस्था सारखा आलास, आशा होती तुला अंधारल्या माळावरच्या मिणमिणत्या कन्दिलाचीच फक्त ...... अरे पण माझ्या कड़े तर सूर्य होता ! अर्थात .. तुला हे ठाऊकच नाही म्हणा. अरे, अनंत कालपटावर स्वतेजाची पखरण करणारा माझा सूर्य ..... तो असंख्य जीवनांचा जनक ! त्या चन्डान्शुच्या प्रखरतेने निथळतानाही वाटे.... त्याचा अनादी जीवनांश तो किरणकरांनी आम्हाला देतोय. अभ्यागता ! पण हां इतिहास झाला. आमचा सूर्यही आता मळल्यासारखा झालाय बघ. वाटते कळिकाळपटाशी झुंजत तो श्रांत झालाय ! त्या हिरण्य गर्भावर चढलीत जळमटे ....
Taxonomy upgrade extras

निराकारी रंगारी

लेखक तिमा यांनी रविवार, 22/02/2009 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे निराकारी कला क्रांतिवीरांनो या वास्तवाला घाबरता का ? गेली चार दशके टाळताय त्याला अन् लपताय दीवाभीतासारखे नुसत्या रंगसंगतीवर किती झुलवणार आम्हाला तुमचे पिवळे हेवेदावे आणि काळे चौकोनी सूर्य किती दिवस बघायचे ? कशासाठी हा वेगळा प्रवास ? तुमचे बाप तिथे मास्तर होते तेंव्हा तुमचे काय चालले होते ? तुमची लफडी, तुमची व्यसने तुमचे स्वप्नभंग, रागलोभ,
Taxonomy upgrade extras

(आड गल्लीतल्या काही कविता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 17/02/2009 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं हल्ली असंच होतं, रामदास ह्यांचं काही लिखाण वाचलं की मी अस्वस्थ होतो. रामदास ह्यांच्या 'अडगळीतल्या काही कविता' ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या कवितांवर 'वा!

"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 17/02/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ? अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...! असो. आपला आज "तो विषय" नाही ... सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत.

`राजा' माणूस!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 17/02/2009 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्तिचित्रं लिहिण्याची मला फार खोड किंवा गती नाही. फार जगावेगळ्या, अफलातून किंवा प्रसिद्ध, नामवंत व्यक्तींशी माझा जवळचा संबंध आलेला नाही. तरीही मनात काही व्यक्तींनी कधी काळी राज्य केलं होतं, त्यांच्याविषयीच्या आठवणी, अनुभव लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. आधी आजोबांबद्दल लिहिलं होतं. आता हे एका (कधीकाळच्या) मित्राबद्दल. ------- काही माणसांचं वैशिष्ट्यच असं असतं, की ती थेट काळजात घुसतात. सर्वार्थानं ती परिपूर्ण असतात, किंवा आदर्श असतात असं मुळीच नाही.

अडगळीतल्या काही कविता.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 17/02/2009 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
काही खास असं नाही या कवितांबद्दल. प्रवासात येता जाता लिहून ठेवल्या होत्या. कधीतरी शंभरेक झाल्यावर प्रसिध्द करू म्हणून.विचार रोज बदलतात.आजच बोर्डावर टाकल्या. १ टाळून कधी वे़ळ कधी नुस्तंच . आयुष्यानी सोडवून घेतलं स्वत:ला. आईनी अंगावरून सोडवावं बाळाला तसंच. आता वेळी अवेळी अनावर हुक्की आली तर .. कविता लिहीतो. * * * * २ दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. * * * * * ३ दहा वेळा कापूनही परत परत उगवणार्‍या लोचट चामखीळीसारखं . नविन वर्षं परत दारात. * * * *
Taxonomy upgrade extras