Skip to main content

मुक्तक

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.

गवार

लेखक जृंभणश्वान यांनी मंगळवार, 13/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
समिधाताईंनी दिलेली गवारीच्या पुर्‍यांची ही पाककृती वाचून गवारीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला. कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत. *** गवार बारकुळी ती, हिरवी हिरवी, छान कोवळी, गवारशेंग मला हवी कुटाबरोबर वाफवलेली, छान रटरटीत शिजवलेली, गवारशेंग मला हवी भले कितीही गोड मटार, फोलपटे बेचव त्याची, पापुद्रयासहित दाण्यांची, गवारशेंग मला हवी आडदांड तो फ्लॉवर केवढा, सात्विक तो श्रावण घेवडा, दुध्याचा डौलदार आकडा अहो घ्या ते शेकडा, घ्या ते शेकडा, पण गवारीचाच सडा दारी माझ्या
Taxonomy upgrade extras

रिक्त

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 11/01/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
रिक्त ========================= . . काही शब्द.. नुसते, आतल्या आत उकळत राहतात.. उतूच जात नाहीत. रटरटत्या पाण्यासारखे.. नुसती वाफ होत राहते.. साठलेल्या भावांची.. चरचरत.. शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत. पात्राला फक्त जाणवत राहत.. रिक्त होण्या आधीच.. वाफाळ रटरटणं..! . . ========================= स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
Taxonomy upgrade extras

तात्या!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 11/01/2009 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
भिकाजी हरी पेंढारकर. म्हणजे माझे आजोबा. आम्ही त्यांना "आजोबा'च म्हणायचो, पण प्रचलित नाव, तात्या. नाव कशावरून पडलं, ठाऊक नाही. मला कळायला लागलं, तेव्हापासून मी त्यांना कष्ट करतानाच पाहत आलोय. माझ्या लहानपणी ते आमच्याजवळच रत्नागिरीला होते. काकांचा मुलगा लहान असल्यानं आजी डोंबिवलीला राहायची. अधूनमधून रत्नागिरीत यायची. आजोबा आणि आजी दोघंही कष्टाळू. आजीला स्वयंपाकाची हौस, तर आजोबांना बाहेरच्या कष्टाच्या कामांची. नारळाच्या झावळा पडल्या, की त्या तोडून पाती काढून ठेवायच्या. मग त्याचे हीर काढायचे आणि केरसुणी तयार करायची. केरसुणी बांधायला शिकावी, तर आजोबांकडून!

माझा बाप, डोक्याला ताप!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 08/01/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची! च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय. कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना!

देव पावला!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 05/01/2009 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही. दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो. नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं. पण पुढे ढकलत होतो.

लग्न करुन तु सासरी गेली आहेस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता.. त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता. आता आपला ग्रुप फुटला आहे, कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर It is my Mess and i Love it पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले, बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड, मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें" तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे... कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस तुझ्या नव्या जगात तु रमली आहे.. तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वे

मोबाईल निरक्षरांच्या दुनियेत!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 04/01/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी. मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही.

माझे मन.....

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 03/01/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता पूर्णपणे माझी नाही. कुठेतरी मी हिंदीत ही कविता अर्धवट एकलेली आहे पण त्या दिवशी दुपारी अचानक माझ्या गुणगूणण्यातून ही छोटी शी कविता तयार झाली.
Taxonomy upgrade extras