आपलेच दात, आपलेच ओठ!
आपलेच दात, आपलेच ओठ!
----------
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांचा तणाव सुरक्षा दलांबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जाणवत होता. सुमारे तीन आठवडे हा तणाव घेऊन वावरणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. देशावरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. काहींनी त्याची गणना 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याशीही केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाविरोधात या वेळी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. पाकिस्तानचा निषेध एकमुखाने केला होता आणि कठोर पावले उचलण्याची मागणीही करत होते. एवढे दिवस हा तणाव सगळ्यांनाच असह्य झाला होता...त्यातून सुटका प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत होती.
मिसळपाव