भिंगार्या
अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगार्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकर्या थापत होती .
लंगडा भिंगार्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगार्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगार्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
मिसळपाव