मॉडर्न अभंगवाणी
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥
संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥
महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥
किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन?
काव्यरस
मिसळपाव