Skip to main content

जागे राहा, रात्र भुताची आहे.... रिलोडेड..... (स्वैर अनुवाद)

लेखक अजिंक्य विश्वास यांनी शुक्रवार, 02/10/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुलांनी सांगितलेल्या विचित्र गोष्टी.... १. मी माझ्या मुलाला- झोप आता. तुझ्या बेडखाली काहीच नाहीये. माझा मुलगा- पण पप्पा , तुमच्या मागे ’तो’ उभा आहे ना! २. माझी ३ वर्षाची मुलगी घरात लाईटस्‌ गेले असताना अचानक म्हणाली,’ बाबा वर पाहा ना. आपल्या पंख्याला कोणीतरी माणूस लोंबकळून झोके घेतोय्‌.’ ३. मी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला गोष्ट सांगत होतो, तेवढ्यात तिने माझ्या हातातील पुस्तक झटकन्‌ बंद केले आणी उघड्या दाराकडे बोट करत म्हणाली, तू निघून जा इथून लगेच. तू आधीच कितीतरी लोकांना मारले आहेस. हे माझे पप्पा आहेत. ४. माझा मुलगा स्वत:शीच हातवारे करत बोलत बसला होता.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:11 या दिवशी प्रकाशित केले.

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

पायजमा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 01/10/2015 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या) फडताळात एक गठुडं आहे, त्याच्या खाली अगदी तळाला जिथे आहेत् भरपुर चिंध्या मफलर चड्डी घोंगडं नाडा त्यातच आहे अस्ताव्यस्त बावरुन पसरलेला एक पायजमा चटेरीपटेरी फुलबॉटम रंग त्याचा काळपट भुरटा माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये हा पायजमा घातला होता पडला होता सा-यांच्या पाया कमरेवर खेचत हाच पायजमा पायजमाच्या अवती भवती दरवळणारा उग्र वास जाणीवे नेणीवेची ओळख अजिबातच नाही त्यास चिकन मटन खेकड्यांतुन वरपत गेल्या किती गटारी पायजम्याने पाहीले ना शाकाहारी...

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

लेखक राजू यांनी बुधवार, 30/09/2015 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते. पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते. कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया. कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो. का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध? का. 2- तसं नाय ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय. का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय का.

एका 'कोसला'प्रेमीचे प्रेमप्रत्र

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/09/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
(हे विडंबन नव्हे, ही 'कोसला'ला दिलेली एक मन:पुर्वक छोटेखानी सलामी - जव्हेरगंज) ******** प्रती :- शंभरातील एकास... प्रिये मी हा असा उकिडवा बसलोय. तुलाच पत्र लिहीत. बनियन बाहेर वाळत घातलाय. आंघोळ अजुन व्हायची आहे. साबणही संपलाय. तुझी खुप आठवण येते. उदाहरणार्थ बादलीत पाणी वगैरे काढलयं. सकाळी तुला बघितलं. भाजी मंडईत. घासाघीस करत होतीस. गुलाबी परकर पोलकं चांगलं होतं. बरी दिसलीस. मी तिथेच शेजारी ऊभा होतो. उदाहरणार्थ झिपऱ्या वगैरे नीट बांधत जा. परवा मागच्या बाकावर बसणारा प्रभुणे तुझ्याकडे बघत होता. तुला द्यायला त्यानं फुलपण आणलं होतं. मी म्हणालो, ती आपली लाईन आहे.

अकबर बिरबल (मोत्यांची शेती)

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 28/09/2015 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा भाग: अकबर बिरबल (मेहुण्याची शिफारस) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकबर बिरबल (मोत्यांची शेती) -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [दृश्य: अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष.

रांगडी रात्र

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/09/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापुर्वीच तिचे मिस्टर दुर कुठेतरी दोन दिवसांच्या अॉफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करुन ट्रॅव्हल भेटल्याची खात्री करुन घेतली. दिवस तसा धावपळीतच गेला होता. एक अनामिक हुरहुर तिला लागुन राहीलेली. घड्याळाकडे वारंवार नजर चालली. तसही करण्यासारखं काही काम नव्हतं. रोजचा छंद म्हणुन बेडटाईम स्टोरीज वाचत पडली होती. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडुन तिने त्याला लगबगीने आत घेतलं. आज त्यानं चक्क बियरचं आणलीये.

स्क्रिन शॉट भाग -५

लेखक राजू यांनी रविवार, 27/09/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला..... " शक्यच नाही ?" पुढे चालु....
स्क्रिन शॉट भाग -५ "शक्यच नाही ? " जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते.

शितोळे (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी रविवार, 27/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
''कुठे चालले ? सातारा का?'' ''नाई सांगलीला'' . ''अरे वा ! मी पण !'' 'त्यात काय अरे वा ?' बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले . ''तुम्हाला प्रवासात झोप येते? '' ''हं '' ''बरंय बाबा !'' शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता. जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही. भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते . ''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !