Skip to main content

मौजमजा

"धागाप्रसवचळ",अर्थात जिल्बिकंडशमनमठ्ठाझल

लेखक नाखु यांनी शनिवार, 02/05/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलो मिपावर,अंगात आहे कळ ! उडी मारली ज्या धाग्यावर तो माझाच होई ! होती बरीच रद्दी थोपु+ब्लॉगात ! कुठे न बघता,येथे टाकत राही ! उरले न आता काही,ठेविले जे मागे ! ते माझे मलाच वाचवत नाही ! फेकुनी देई झमेला,या नव्या त्रांगड्यात ! सुट्टे ना जे मिळाले मोजूनी आता पाही ! उघडून पाह्तो धागा,प्रतीसाद एक नाही ! वाचनांची संख्या वाढत मात्र राही ! काही करू तरी जिल्बीकंड शमेना ! वाहव्वाच्या भुलथापेत मी चूर राही ! रोज नवे धागे प्रसवीत मीच आहे ! वाचक पकला तरी निराश मी नाही ! टाकला धागा पहिला,लॉगिन झालो तेव्हा ! चावेल का मला कोणी, वाचेल तो जेंव्हा ! उमजून घेण्या थोडे,उगा रूजवात क

भूकंपामागची कारणे

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 28/04/2015 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही.

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळ

क्रीडायुद्धस्य कथा - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 22/04/2015 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी जुनी.... म्हणजे तितकीही जुनी नाही.... पण तरीही आजच्या मानाने जुनीच! पूर्वी - म्हणजे फेसबुक अस्तित्वातही नव्हतं तेव्हा.... आयफोन, आयपॅड सोडाच - आयपॉडही नव्हता. विकिपीडिया, यूट्यूब, ट्विटर... काही काही नव्हतं. माणसं चालताना समोर बघत चालायची. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नसायचा. २४ X ७ न्यूज चॅनल्सचं पेव नव्हतं फुटलेलं... सास बहू सीरियल्सना कोणी सीरियसली घ्यायचं नाही त्यामुळे टीव्ही पण कमीच पाहिला जायचा. इंटरनेटच धड नव्हतं तिथं कसलं ई-कॉमर्स अन कसलं क्लाउड कम्प्यूटिंग! तर सांगायची गोष्ट. आजच्या पेक्षा फारच वेगळा काळ होता.

डोंबिवलीला, फूलपाखरांच्या बागेत, मिपा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 19/04/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी फूलपाखरू.. निसर्गाचं ‘पंखधारी रत्न’च जणू. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या सुंदर, छोट्याशा जीवांबद्दल माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने डोंबिवलीच्या रोटरी क्लबने रविवारी, दि. २६ एप्रिल, २०१५, सकाळी ९ ते १२ या वेळात रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेजसमोर, डोंबिवली (पू.) या ठिकाणी ‘डोंबिवली फूलपाखरू महोत्सव’ आयोजित केला आहे.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

गोंधळ

लेखक नाखु यांनी सोमवार, 06/04/2015 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो .