Skip to main content

मौजमजा

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 19/09/2007 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.) संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले. या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.

मराठी अंताक्षरी

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 17/09/2007 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.