Skip to main content

मौजमजा

खाडीतली खारफुटी दुनिया १

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 23/07/2015 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
खाडीतल्या खारफुटीच्या जंगलात गेलो होतो. एवढी वर्षं ती खाडी दोन लांबलचक पायवाटा घेऊन माझी वाट पाहात बसली होती. त्यातल्या एका वाटेवरून लहान असताना मित्रांसोबत एकदोनदा जाऊन आलो होतो. तिथे लोक सायकली घेऊन जाताना मला दिसायचे. मलाही घेऊन जायची होती. एकदा गेलो घेऊन, एकटाच. पण माझं रस्त्यांचं ज्ञान अगाध असल्यानं मी ती वाटच शोधू शकलो नाही. कुठेतरी खडी साठवलेली दिसली. एका ठिकाणी अमूक एका भूखंडाची जागा खाजगी मालमत्ता असल्याचं सांगणारा बोर्ड दिसला. असं वाटलं, की कदाचित गेली ती जागा कोणत्यातरी बिल्डराच्या घशात. मग फिरकलोच नाही इतक्या वर्षांत. आणि आता गेलो. इतक्या वर्षांनी. दुस-या वाटेने.

ही "सनी"ची लक्तरे...

लेखक दमामि यांनी बुधवार, 22/07/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेर्ना! ही मनाची अंतरे इंच अथवा सेमी ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही "सनी"ची लक्तरे... प्रत्यक्ष भेट आपली रात्र ती नशिबी कुठे मनात उतरवायची ही "सनी"ची लक्तरे... जन्म घेती नवनव्या फाइल संगणकावरी जागा किती व्यापायची ही "सनी"ची लक्तरे... एकमेका फोन देणया आज सारे टाळती प्रथम ती मिटवायची ही "सनी"ची लक्तरे... लांब आहे जायचे ,अन प्रवासही एकटा सोबतीला घ्यायची ही "सनी"ची लक्तरे...

चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 02/07/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे. मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो. आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले. पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान. यान्बूत तर बरेच कट्टे केले. ते असो. तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.) कळावे, लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती. कृपया, चेनैकर मिपाकरांनी व्यनि मार्फत संपर्क करावा. आपलाच (कट्टेकरी) मुवि

अग अग म्हशी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 27/06/2015 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
अग अग म्हशी ............... एका गावत एक ब्राह्मण रहात असतो.. पत्नि व २ मुले असतात..बंड्या अन काशी थोडी शेति असते ..

(खरा) इनर पीस

लेखक टवाळ कार्टा यांनी मंगळवार, 23/06/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745 कमुंची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------- "तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता. शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली. अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक?

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

बालपण

लेखक Hrushikesh Marathe यांनी बुधवार, 03/06/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो. चालता चालता नजर रस्त्याबाजूच्या एका छोटयाश्या इमारतीवर गेली. ती छोटी इमारत दुसरं तिसरं काही नव्हे तर एक शाळा होती. शनिवारचा दिवस होता, अर्थात सकाळची शाळा. तो तास खेळाचा होता बहुतेक. छोटयाश्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काही मुली घोळका करून उन्हात उभ्या होत्या, काही उत्साही मुलं शाळेच्या आवाराची साफसफाई करत होते. काही जण झाडांना पाणी घालत होते. तर काही मुलं आबाधुबीच्या नावाखाली आपले हात साफ करत होती. हे सगळं पाहताना दोन क्षण सुखावलो.

तपश्चर्येचे फळ ???

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/06/2015 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते.

मित्रवेडा

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 02/06/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स. थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स. डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं अन तंद्री भंग होता होत नाही पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.