मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौजमजा

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
कविता-रतीचे | विभ्रम अनंत तयांचे गणित | कैसे करू? तरीही करितो | वेडे हे धाडस माझ्या अक्षरांस | हासू नये :) ~~~~~~~~~~~ कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास कवितेचे गणित कसे हे उत्तर ना त्याचे कळते ओळींच्या मधली जागा गणिताला डिवचून जाते गणिताच्या मर्यादांचा ज्या कुणी(@) लाविला शोध तो कवी नसावा हृदयी याचा नच उरतो खेद ~~~~~~~~~~~ @ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.

(π)वाट

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
स्पर्शरेषा जोखते जणु वर्तुळाची वक्रता परीघ अंशी / व्यास छेदी (π) उरवी तत्त्वता वर्तुळाचे केन्द्र जीवा # ना कधीही स्पर्शिते केंद्र गिळता तीच जीवा व्यास बनुनी राहते (π) द्विगुणित होऊनी परिघास जेव्हा भागतो हाती ये त्रिज्या-जिला व्यासार्ध कुणी संबोधितो वर्तुळाच्या गारुडाने भूल गणिती टाकली जटिल विद्यांची कवाडे (π) करितो किलकिली परीघ, त्रिज्या दोन्हीही परिमेय असती पण तरी (π ) का मज वेड लावी अपरिमेयाचे परी ~~~~~~~~~~~~~ # जीवा = chord of a circle (π) = 3.14..... अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
केस पांढरे तरी हा डाय लावतो हिरवा पाखरांनो सावधान घुमे टेचात पारवा केस पांढरे तरी हा डाय गुलाबी लावतो पाखरांनो उडलात तरी पिसे हा मोजतो केस पांढरे तरी हा काळा कलप लावतो पाखरांनो सावध हा दाणे दुरून टाकतो केस पांढरे तरी हा अंतर्यामी अतरंगी पाखरांनो नका भिऊ निर्विष याची हो नांगी (#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त ·
काव्यरस
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.

सहा कोवळे पाय

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)

फाया

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला?

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

कृष्णविवर

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
शतसूर्यांची जळती बिंबे गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे स्थळकाळाची अदय शृंखला तटतट तोडून हिंडत आहे क्षुधा अपरिमित अंतर्यामी धगधग पेटून उठली आहे आदिम स्वाहाकार सूक्त का पुनश्च अविरत गुंजत आहे? विज्ञानाचे नियम तोकडे- विपरित त्यांच्या घडते आहे भवताला घोटात गिळुनिया कृष्णविवर हे हिंडत आहे "विझत्या सूर्यावरती लट्टू नार नवेली पृथ्वी आहे" कृष्णविवर संतप्त होऊनी अथक स्वतःला कोसत आहे

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे