कवितेच्या गणिताची कविता + - x ÷
लेखनविषय:
काव्यरस
कविता-रतीचे | विभ्रम अनंत
तयांचे गणित | कैसे करू?
तरीही करितो | वेडे हे धाडस
माझ्या अक्षरांस | हासू नये :)
~~~~~~~~~~~
कधी बेरीज बेचैनीची
कधी वास्तव वजावटीस
कधी गुणाकार गहनाचा
कधी भागे कवी शून्यास
कवितेचे गणित कसे हे
उत्तर ना त्याचे कळते
ओळींच्या मधली जागा
गणिताला डिवचून जाते
गणिताच्या मर्यादांचा
ज्या कुणी(@) लाविला शोध
तो कवी नसावा हृदयी
याचा नच उरतो खेद
~~~~~~~~~~~
@ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.
वाचने
1433
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
कविता ....
आवडली कविता
In reply to आवडली कविता by स्वधर्म
आमचे येथे
In reply to आमचे येथे by अनन्त्_यात्री
आमची शाखा इतरत्र
In reply to आमची शाखा इतरत्र by कर्नलतपस्वी
दुपारी १ ते ४
आवडली