Skip to main content

फाया

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/06/2025 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला? कृबुच सर्व देई !" कठोर शब्दे मानवी प्रतिभा दुःखमग्न झाली नवक्षितिजांना ओलांडुन कृबु पार पुढे गेली हताश होत्साती प्रतिभा क्षण-भर निष्प्रभ झाली पुन्हा सावरून मनात काही जुळवून मग वदली, "कृबुवरती स्तुतिसुमने उधळीत होऊ नको दंग कारण विरहित कार्य कधीतरी असते का सांग ? असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" ~~~~~~~~~~~~~~~~~~ (*) कृत्रिम बुद्धिमत्ता फाया: अत्तर लावण्यासाठी वापरला जाणारा कापसाचा बोळा
लेखनविषय:

वाचने 802
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते. संकल्पना आवडली.