(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख).
दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.