मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख). दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता. थोडी बहुत मराठी हि त्याला कळते. त्याने मला विचारले बाबासाहेब पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, माहित आहे का? त्या बाबत काय म्हणायचे आहे. त्याने जाणता राजा पाहिल्याचे हि सांगितले. मी म्हणालो, पुरंदरे यांचे शिवचरित्र फार ३०-३५ वर्षांपूर्वी वाचले होते. आता काही विशेष आठवत नाही. राजनैतिक कारणांमुळे त्यांना पुरस्कार देण्याचा विरोध होतो आहे. एवढेच टीवी पाहून कळते. तो खळखळून हसला. मला म्हणाला विरोध पुरंदरे यांना नाही, अपितु हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांचे गुणगान करणाऱ्या शाहिराला देण्याचा होतो आहे. विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही. शिवाजी राजांचे गुणगान धर्मनिरपेक्ष लोकांना आवडत नाही. च्यायला त्याच्या या जावई शोधामुळे माझी विकेटच उडाली. मी त्याला विचारले, या विधानाला काही पुरावा आहे का? तो म्हणाला शाहिरांचे नाव घेतल्या बरोबर लोकांना शिवाजी राजा आठवणार, मुघलांचे अत्याचार आठवणार, अफजलखान आणि शाहिस्तेखान आठवणार. भूषण हि आठवणार, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी हे हि आठवणार. औरंगजेबाचे संपूर्ण भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न महाराष्ट्रात भंगले. हिंदवी साम्राज्याची घुड दौड उत्तरे पर्यंत पोहचली. अहल्याबाई होळकर समेत अनेक मराठा सरदारांनी उत्तरेतल्या हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला.....इत्यादी. एका रीतीने हिंदवी साम्राज्याचे स्वप्न साकारल्या गेले. सारांश शिवाजी राजेंमुळे देशाचे इस्लामीकरण करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न भंग झाले. सत्य हेच आहे, आजच्या अल्पसंख्यक नेत्यांना शिवाजी आवडत नाही. त्यांना प्रसन्न करण्यासाठी शाहिरांना पुरस्कार देण्याचा विरोध करणे आवश्यक होते. मी त्याला विचारले विरोध करण्याने शरद पवारांना काय फायदा होणार? तो म्हणाला कांग्रेस ने ब्राह्मण+ दलित + मुस्लीम गठ्जोडची राजनीती करून देशावर शासन केले. वीपी सिंग यांनी कांग्रेसच्या राजनीतीला सुरंग लावला. ओबीसी + मुस्लीम गठ्बंधन पुढे आणले. मायावतीने दलित+ मुस्लीम आणि ब्राह्मण कार्ड खेळले. तसेच बिहार मध्ये लालूने हि मुस्लीम + यादव कार्ड खेळले. या सर्वांना सत्ता मिळाली. दोन्ही राज्यात अल्पसंख्यक आणि दलित कॉंग्रेस पासून दूर गेले. बाकी उरलेले भाजपात गेले. दिल्लीत ही लोकसभेच्या निवडणूकीत हिंदुवादी भाजप जिंकली. कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. केजरीवाल यांनी या मौक्याचा फायदा घेतला. दिल्लीतलेली ८०% अल्पसंख्यक मते आपकडे वळवली. भारी बहुमताने विधान सभा निवडणूक जिंकली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नौटंकी सोडून व्यवस्थित राज्य केले तर कॉंग्रेस दिल्लीत हि संपुष्टात येईल. महाराष्ट्रात हि जर अल्पसंख्यक मते राष्ट्रवादीकडे वळली, तर शरद पवारांची बल्लेबल्ले होईल. ज्या शरद पवारांनी कित्येकदा शाहिरांचा सम्मान केला, त्यांचे अनुयायी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्या आदेशनुसार हे सर्व घडले. बाकी कांग्रेसचे म्हणाल तर वरून काही हुकुम आला नाही. विरोध कि समर्थन काय करायचे त्यांना कळले नाही. त्याचे इतिहास ज्ञान पाहून मी विचारले आपने इतिहास पढ़ा है क्या? और एक बात क्या आप पूर्वांचली हो क्या? किसी भी बात में राजनीती ढूंढकर उसका गहरा विश्लेषण कोई पूर्वांचली हि कर सकता है. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. संभाजी ब्रिगेडवाले तर शिवाजी राजेंना आपला आदर्श मानतात. त्यानी का विरोध केला. तो म्हणाला, मी पूर्वांचली आहे, मला बीए मध्ये इतिहास हा एक विषय होता. आयुष्यात त्याचा कही उपयोग झाला नहीं हे वेगळे. बाकी संभाजी ब्रिगेडचे म्हणाल तर, रस्त्यावर दंगामस्ती, तोडफोड करणार्या छुटभैये नेत्यांना आपल्या राजनीतिक आकाना प्रसन्न करून राजनीतिक जीवनाची सुरुवात करायची असते. वरिष्ठ नेता प्रसन्न झाले तर निदान 'वार्ड' ची तरी निवडणूक लढायला मिळू शकेल, हि अपेक्षा. बाकि इतिहास वैगरेह किंवा पुरंदरे यांच्या लेखानाबाबत त्यांच्या पैकी अधिकांश लोकांना काही माहिती ही असेल मला नाही वाटत. असली तरी हि, राजनीतिक उद्देश्य साधण्यासाठी त्याच्या कडे दुर्लक्षच करतील. तेवढ्यात माझे स्टेशन आले, मी मेट्रोतून उतरलो. घरी येता येता विचार करू लागलो. त्याच्या बोलण्यात हि तथ्य होते. महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत पूर्वांचली (भैयांची) लोकांची संख्या भरपूर आहे. ते हि निवडणूकीत मते देतात. एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख.

वाचने 7554 वाचनखूण प्रतिक्रिया 41

श्रीरंग_जोशी 22/08/2015 - 09:22
रोचक निरिक्षण तुमचे पुर्वाचली माणसांबद्दल अन त्याचे राजकारणाबद्दल अन त्यातही महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल.

अनिरुद्ध.वैद्य 22/08/2015 - 09:50
पण ध्रुवीकरणाचा नेमका फायदा कोण उठवेल आत्ताच सांगता येणे मुश्कील, कारण AI-MIM. मुस्लीम मतदारांनी त्यांची मते ओवैसीकडे झुकवली, तर पवारांना निव्वळ मराठा मतांच्या आधारे जिंकता येईल का? मुस्लीम ध्रुवीकरण झाले तर त्याला प्रतिसाद द्यायला हिंदू ध्रुवीकरण होईलच. संघ तो चान्स सोडेल असे वाटत नाही. बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ध्रुवीकरण प्रकार सुरु झालेत!! कधी आपण भावनिक मुद्यांच्या आधारे आणि जाती धर्माधारे मत देणे सोडू ... देव जाणे.

मोहन 22/08/2015 - 10:54
जबरदस्त !

कैलासवासी सोन्याबापु 22/08/2015 - 11:19
सेंट्रल गवर्नमेंट ला ते ही खाश्या पूर्वांचलात ड्यूटीरत असल्या कारणे मला ह्याचा पुरेपूर अनुभव आहे!!

हेमन्त वाघे 22/08/2015 - 13:16
लेख आवडला! आपले नाव टाकून व्हात्साप्प वर टाकू का?

हेमंत लाटकर 22/08/2015 - 16:37
लेख चांगला आहे. मेट्रोमध्ये ज्या माणसांबरोबर हा संवाद झाला त्या मामसांच्या बोलण्यात तथ्य वाटते. शरद पवारांच्या बाबतीत म्हणाल तर सध्या राष्ट्रवादी सत्तेत नसल्यामुळे काही कामच राहिले नाही. मग काहितरी विषय काढून स्वत:चे अस्तित्व दाखवायचे. खर तर 70 वर्षीवरच्या सर्व राजकारण्यानां सक्तीने रिटायर्ड केले पाहिजे.

चलत मुसाफिर 22/08/2015 - 23:04
राजकारणी हे अत्यंत पाताळयंत्री असून त्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे असतात. तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते तर संपूर्ण लाज सोडून केवळ मतपेटीचे हिशोब घालत राजकारण करतात. कारण खरोखरीची धर्मनिरपेक्षता त्यांच्यापैकी कोणालाही बापजन्मी आत्मसात करणे शक्य नसते. तसेच त्यांना हपापलेले झुंडखोर कार्यकर्तेही हवेच असतात. कारण ते मूळ विषयाचे शष्प ज्ञान नसले तरी अजिबात न शरमता नारेबाजी करत बेफाम राडा घालू शकतात. अशा कळपाचा विरोध करायचा असेल तर तसाच एक विरौधी कळप बनवणे यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे फक्त बेशरम आणि महत्वाकांक्षी लोकांचे फावते आणि एकूणच राजकारण गलिच्छ होते.

चौकटराजा 23/08/2015 - 18:30
हे सगळे जे झाले त्यातील जितेंद्र आव्हाडांचे म्हणणेच अधिक पटण्यासारखे आहे. चुकीच्या इतिहासाला राजमान्यता मिळाली म्हणून त्याना राग आला होता. चुकीचा इतिहास , खळबळजनक इतिहास अनेक जण लिहितात. त्यांची अनेक पुस्तके खपली तरी कोणाचे पराकोटीच्या आग्रही पणाचे असे काही म्हणणे नसते. त्याला राजमान्यता मिळाली की मग कुणाचे तरी माथे भडकणे साहजिकच आहे. हे पारितोषिक दिले गेले ई ठीक आहे.पण खरा इतिहास काय तो पुढे आलाच पाहिजे. माझ्या मते तो शीधण्याचे कार्य करण्यास दोन्ही पक्षाना ( पुरंदरे व अपुरंदरे ) यानी कोणी भविष्यात भाग पाडेल असे वाटत नाही. मात्र यात एक राजकीय धडपड पवारांची आहे असे वाटत नाही. पूर्ण मराठा समाज देखील त्यांच्या पाठीमागे कधी नव्हता. आता एम आय एम असताना मुस्लीम त्यांच्या पाठीमागे केवळ अशा चाली मुळे येणार नाहीत. हिंदू समाज भाजपाच्या मागे एकसंधपणे उभा राहिल्याने तीनशे ई जागा मिळाल्या असे नव्हे तर मनमोहन सिंग व सोनिया यांचे मौखिक दुबळेपण व त्यात मोदी यानी त्यांच्यावर केलेली मात याचा फायदा भाजपाला झालेला आहे .थोडक्यात काय मुस्लीम दलित सारेच विखुरणार आहेत. ती आता कार्डे रहाणार नाहीत.

In reply to by चौकटराजा

जेंव्हा पुरुषोत्तम खेडेकरांनी वेगळा शिवधर्म काढला तेंव्हा जितेंद्र आव्हाडांना शिवाजी महाराजांचा किंवा जिजामातेचा अपमान झाल्यासारखा वाटला नाही का ? त्यावेळी त्यांना किंवा त्यांच्या बोलवित्या धन्याला राग का आला नाही ?

In reply to by चिनार

नाखु 25/08/2015 - 08:21
पाठींबा फक्त एकच अजाण बालबुद्ध प्रश्नः
विश्वास पाटलांनी चर्चेचे दिलेले जाहीर आणी खुले अव्हान (पुरंदरेच्या पुस्तकात अवमानकारक आणि @@@@@ इतीहास आहे असा ब्रिगेडी आरोप होत आहे त्याचा प्रतीवाद म्हणून) ते कुणीही

विचारजंतांनी

का स्वीकारले नाही आणी चुकीचा इतीहास नक्की काय आहे ते कुठेही (अगदी मिपावरही) कणभरही का देऊ शकले नाहीत ? आणि देणारही नाहीत.
अगदी जन्मदिवसाचा घोळ असलेल्या युग प्रवर्तक राजाच्या राज्यातील एक अतीशूद्र प्राणी नाखु

In reply to by नाखु

चौकटराजा 25/08/2015 - 10:23
खरा व खोटा इतिहास म्हणजे तरी काय याची तयारी अपुरंदरेंकडे पुरेशी नसणार.समजा असली तरी त्याना त्यात खरेच व्यासंगी रस किती असेल याची शंका यावी. मला एवढेच म्हणायचे आहे की हे राजकीय कार्ड वगैरे काही नाही.( ते राग कीय कार्ड आहे फक्त ). असले तर अगदी क्षीण.( म्हणजे पुण्यातील सदाशिव पेठेतील मते भाजपाला न पडता मनसेला पडतील अशी भाबडी आशा ठेवणे वगैरे किवा एमाय एम ची मते पवाराना मिळणे ) म्हणूनच मी वर म्हटले आहे की दोन्ही पक्षाना संशोधनाला भाग पडेल असा प्रयत्न होणार नाही. पाटलांचे आव्हान वा आवाहन जे काय असेल ते आहे इथेच राहील. पहा.....आता सगळे थंड झाले आहेत की नाही ..... ?

विवेकपटाईत 23/08/2015 - 18:40
विषय पुरंदरे आणि इतिहासाचा नाही आहे, एक गैर मराठी माणूस या घटनाक्रमा कडे कोणत्या दृष्टीने पाहत आहे, इथे आहे. बाकी जातीगत राजनीती भारतीय राजनीतीछचे वैशिष्ट्य आहे.

dadadarekar 24/08/2015 - 07:01
हिंदुत्ववाद्यांचे दोन लाडके मुद्दे असतात. १. मराठ्यांमुळे मुस्लिम मागे पडले. २. काँग्रेसमुळे ( + गांधीजींमुळे ) मुस्लिम फोफावले. मुस्लिम व मोघल स्वयंभू होते / आहेत. ... दादूमियाँ मोघलकर

In reply to by तुडतुडी

काळा पहाड 25/08/2015 - 00:22
लक्ष द्यू नका. बाटगा जास्त कडवा असतो म्हणतात. ते मोगल पण हसत असतील. ज्याच्या पूर्वजांना जबरदस्तीनं बाटवलं त्याचीच जाहिरात त्याचाच वंशज करतोय म्हणून. स्वयंभू पद्धतीनं बाटवलं होतं काय कोण जाणे.

In reply to by dadadarekar

होबासराव 25/08/2015 - 11:40
वो दो सतरंजी किधर को बेचे ?

In reply to by होबासराव

नाखु 25/08/2015 - 11:44
न"माजा"स वापरत असेलेने मागू नये. आज्ञेवरून अभामिपाचिंधेचोर्फुटॉसंचालित्फुटकळ्कोंबडीचोर्संघटणा. भिवंडी खुर्दा

In reply to by dadadarekar

चिनार 26/08/2015 - 10:13
दादा..ते शिया ,सुन्नी, कुरेशी वगैरे कोण हो ? म्हणजे आधी शिया की आधी सुन्नी ? हज यात्रेमध्ये या सगळ्या पंथांना प्रवेश असतो का ? आणि यांच्यात वाद कशामुळे सुरु आहे ? ते जिहाद का काय म्हणतात ते यांचातल्या कोणत्या पंथाचे ? मोघल म्हणजे शिया की सुन्नी ? माहितीसाठी विचारतोय..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 24/08/2015 - 17:13
विचारांचा असाही एक पैलु आवडला. -दिलीप बिरुटे

तुडतुडी 25/08/2015 - 15:00
मोघलानी स्वबळावर देश जिंकून उपभोग घेतला... म्हणून ते स्वयंभू.>>> हे हे हे .कृपया आधी अश्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यावा आणि मग ते वापरावेत . तलवारींच्या आणि बंदुकांच्या , बॉम्बच्या जोरावर 'हिसकावलं' जातं . 'जिंकलं' जात नाही . आणि अश्या गोष्टीचं आयुष्य खूप थोडं असतं . जगात स्वयंभू धर्म तीनच . आर्य , यहुदी आणि पारशी .

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 21:57
तुम्ही कुणाचं तत्वज्ञान चोरुन आलायत ते बघा. यहुदी आणी ख्रिस्त्यांचं चोरून वर फुकट तोरा कशाला. स्वतःचं काय हाय का तुमच्याकडं? उष्टं खाऊन वर आम्हीच शाणे म्हणायचं.

In reply to by dadadarekar

मांत्रिक 25/08/2015 - 22:26
अन्य दोन्ही धर्मांची मुळे वैदिक धर्मातच सापडतात. वैदिक धर्माचे अपत्य हिंदु धर्म. बरे बौद्ध व जैन धर्म स्वतःला हिंदु धर्माचा विरोधी मानत नाहीत. त्यामुळे फार मोठा मुद्दा मिळाल्याच्या भ्रमात राहू नका.

In reply to by dadadarekar

विनोद१८ 25/08/2015 - 23:10
अरे नान्या हे सगळे तुझे बापच, यांना तु कसा काय विसरलास ?? मला वाटते तुला तुझे उत्तर मिळाले, बरोबर ना ?? आणखी असेच काहीसे प्रश्न असतील तर विचार त्याचीसुद्धा उत्तरे देतो.

राही 26/08/2015 - 07:07
जैन आणि बौद्धांना हिंदू समजणे किंवा हिंदूंच्या बाजूचे समजणे चूक आहे. जगात बौद्ध धर्माचा प्रभाव हिंदूंहून फार मोठ्या क्षेत्रात आहे. शिवाय निदान भारतात तरी हिंदूंना बौद्ध बनवण्याचे कार्य चालू असते. (कट किंवा कारस्थान नव्हे.) जैनांची तर आणखी वेगळी गोष्ट आहे. यांचा छुपा धर्मप्रचार हिंदूंच्या कधीच लक्षात यायचा नाही. अर्थात ते कायदेशीर आहे. पण गुजरातमधल्या आदिवाशांमध्ये आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधूनही धर्मबदलाचे काम जोमाने चालू असते. याला कारण अर्थात जैनांच्या चॅरिटीज़. त्यांची अनाथालये, हॉस्पिटल्स आहेत, अनाथबालकाश्रम आहेत. तिथे सूक्ष्म पातळीवर हे काम चालते. जैन लोक त्यांच्या धर्मस्वातंत्र्याबाबत अत्यंत आग्रही असतात आणि पैशाच्या जोरावर राज्यकर्त्यांकडून बिनबोभाटपणे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात ते यशस्वी ठरतात. त्यांना दुखवणे सहसा शक्य नसते कारण अर्थात मोक्याच्या वेळी त्यांच्याकडून होणारी मदत.

In reply to by राही

dadadarekar 26/08/2015 - 08:48
ज्या वेळेला जैन व बौद्ध धर्म पसरत होते , तेंव्हा हिंदू धर्माने त्याना विरोध केला होता. आता मुस्लिम ख्रिस्चनांविरुद्ध लढायला हेड काउंट वाढवायचा असल्याने हेच हिंदू बौद्ध जैन हे आमचेच पंथ आहेत असे खोटे सांगत फिरतात. आणि हजार वर्षानी अजुन कुठले तरी दोन धर्म आले की हिंदू लोक मुस्लिम ख्रिस्चन हेही आमचेच पंथ आहेत असे तेंव्हा कळवळून सांगतील.

राही 26/08/2015 - 07:14
शिवाजीराजेंचे गुणगान नको आहे हे म्हणणे पटण्यासारखे नाही. ब्राह्मण-अब्राह्मण, मराठा-मराठेतर, ओबीसी हे सर्व लोक शिवरायांना कट्टरपणे आपले'च' मानतात. वाद फक्त शिवरायांचे कोणते गुण श्रेष्ठ मानावे याबद्दल आहे. शिवरायांप्रतीचा आदर महाराष्ट्रात रतीभरही कमी झालेला नाही. उलट तो कट्टरतेने वाढतो आहे. ब्राह्मण-मराठा वाद महाराष्ट्रात दीड शतक इतका जुना आहे. अधूनमधून तो उफाळून येतो इतकेच.