Skip to main content

मांडणी

गाव, शहर आणि बरंच काही

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 06/05/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब फक्त माणसांनाच असतं असं नाही. ते जमिनीच्या तुकड्यालासुद्धा असतं . कुणाच्या नशिबी समुद्राची साथ असते तर कुणाच्या नशिबी पर्वतांची रांग. नुसतं नशीबच नाही, स्वभाव असतो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला. चेहरा असतो, भूतकाळ असतो आणि वर्तमानसुद्धा. तो तुकडाही तसाच होता. त्याला आठवतं तेव्हापासून समुद्राची सोबत होती. परदेशी पाहुणे आणि परदेशी माल ह्यांची नवलाई त्याला कधीच नव्हती. त्याच्या किनाऱ्याला गलबत लागायची आणि मालाच्या किंमतीची खलबतं व्हायची. आजूबाजूच्या प्रदेशात सत्ता कुणाचीही असेना ह्याच्यावर राज्य व्यापारी लोकांचंच असायचं.

प्रताधिकार कायदा: अस्पष्टता, गल्लत, गफलती, विरोधाभास इत्यादी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 04/05/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
कायदे मंडळांपुढे मंजुरीसाठी बहुतांश कायदे शासन यंत्रणा आणत असली तरी श्रेय कायदे मंडळांना जाते पण कायदेमंडळांच्या विशेषाधीकारांमुळे कायद्यात काही उणीवा शिल्लक राहील्यास उणीवांवर टिका करता येते, पण कायदेमंडळातील सदस्यांच्या कारभाराकडे बोट दाखवणे कठीण असते. भारत सरकारकडची कायदे तयार करणारी यंत्रणा, (सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकील मंडळी सरकार दरबारी आणि विरोधी पक्षात आणि संसदेत मोठ मोठे मानमरातब मिरवत असतात) त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या समीत्या संसद सभागृह, कायदे राबवणारी यंत्रणा या सर्वातून जाऊन बहुतेक सर्व शुद्धीकरण करूनच कायदे बाहेर येत असावेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

रॅंडम विचारांची कंडम साखळी

लेखक अभिशेखि यांनी रविवार, 03/05/2015 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज तसं बऱ्याच दिवसांनी पेन हातात घेतलंय. काय लिहावं याबद्दल काहीही कल्पना नाही. जितका कोरा कागद तितकंच मनही कोरं. विषय,विचार मनात येतच नाहीयेत. विचारांविना शब्दांनाही फारशी ताकद नाही. अधिक सामर्थ्यवान कोण? विचार की शब्द असले प्रश्न मनात घुटमळत राहतात. विचारच सामर्थ्यवान. शब्द तर केवळ एक माध्यम, विचारांना व्यक्त करण्याचं. खरंतर आम्ही खेळायला हवेत विचारांचे खेळ. पण बऱ्याचदा आम्ही शब्दांचेच खेळ खेळतो आणि त्यातच गुरफटून राहतो. सामर्थ्यवान कोण हा अक्ख्या मानवजातीचा आवडता प्रश्न. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजेच मानवजातीचा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

लेखक योगविवेक यांनी गुरुवार, 30/04/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

ऑटो रायटिंग पशुपतीनाथ मंदिरात

कथन – विवेक चौधरी, जळगाव. (नेपाळ यात्रेतील ओकसरांचे सहकारी)

23-26 मार्च 2015 मधे भृगुसंहितेच्या शोधात ओक सरांचे व माझे गमन झाले. त्याचा संक्षिप्त अहवाल आपल्याला अन्यत्र वाचायला मिळेल. त्या प्रवासात ज्या अदभूत घटना घडल्या त्यातील एक होती ती पशुपतीनाथाच्या मंदिरपरिसरात अचानक उद्भवलेले ऑटोरायटिंग...! टीप - आमच्या यात्रेनंतर 25 एप्रिल 2015ला नेपाळमधे धरणीकंप झाला होता.

भृगुसंहितेच्या शोधात... 2

लेखक योगविवेक यांनी रविवार, 26/04/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला.

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.

भृगूसंहितेच्या शोधात... १

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 22/04/2015 23:55 या दिवशी प्रकाशित केले.

भृगूसंहितेच्या शोधात...

नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

सादरकर्ताः विवेक चौधरी.

a जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर. नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

मिस्टिसिझम - एक चिंतन - १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 14/04/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिस्टिसिझम हा शब्द मिस्टिक आणि इझम या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. मिस्टिक या शब्दाला साजेसा दुसरा इंग्लिश शब्द मिस्ट्री आहे आणि दोहोंमध्ये अर्थाच्या दृष्टीने साम्यच आहे. सर्वसामान्यपणे दोन्ही शब्दांचा अर्थ गूढ, रहस्यमय असाच अर्थ केला जातो. दोन्ही शब्दांच्या मूळाशी ग्रीक धातु म्यून (muien) आहे. याचा अर्थ गप्प बसणे असा आहे. आपल्याला त्यावरूनच आलेला म्यूट (mute) शब्द परिचितच आहे. अशा पार्श्वभूमीवर मिस्टिक वा मिस्ट्रीला गूढ, रहस्यमय असा अर्थ कसा प्राप्त झाला असावा?