मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

pradnya deshpande ·
भाग १, भाग २, भाग ३ सैरभैर हात या हाताना काम हवे एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.

दुष्काळवाडा.... भाग ३ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास

pradnya deshpande ·
भाग १ भाग २ कोरडवाहू मराठवाड्यात उसाची मिजास ऊस तोडणी औरंगाबादमध्ये साखर कारखाना संचालकांची बैठक दोन दिवसांपूर्वीच झाली. या वर्षीचा गळीत हंगाम पाण्याअभावी कसा रेटायचा हा प्रश्न कारखान्याच्या संचालकांसमोर होता.

दुष्काळवाडा......... भाग-२ ढगात अडकला कृत्रिम पाऊस

pradnya deshpande ·
हजारो कोटींची तातडीची मदत जाहीर करण्यापेक्षा कोटीत कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी राहते. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न म्हणून मायबाप राज्य सरकारने मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचे केंद्र मराठवाड्याला दिले. पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केले. जुलैच्या पहिल्या महिन्यात झालेल्या या घोषणेला प्रत्यक्षात यायला ऑगस्टचा पहिला आठवडाच उजाडला.

दुष्काळवाडा........

pradnya deshpande ·
जेव्हा जेव्हा निसर्ग चक्र उलटे फिरते तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील शेतकरी फासाचा दोर जवळ करतात. मागील एक वर्षात मराठवाड्यात सुमारे चारशेच्यावर शेतकNयांनी आत्महत्या केल्या. अजूनही हा सिलसीला थांबलेला नाही. सततच्या दुष्काळाने उद्धस्त झालेली शेती व्यवस्था आणि निष्क्रीय उपाय योजनांमुळे मराठवाड्याची ओळख साNया देशाला आत्महत्या करणाNया शेतकNयांचा दुष्काळवाडा म्हणून होईल की काय याची भीती वाटते.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

शेखरमोघे ·
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

विवेकपटाईत ·
(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख). दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

मारवा ·
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो.

भाषेरी कुंपण

अर्थहीन ·
लेख दुसरा... हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन... प्रतिक्रियांची वाट पाहत आहे... ........भाषेरी कुंपण......... आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय. पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय. मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय. माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही. अन वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही. (मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग. मी यशस्वी होईल??

आमचीबी चालुगिरी…

विशाल कुलकर्णी ·
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.