मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

दाराआडची मुलगी

शिव कन्या ·
काव्यरस
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या

देव

अन्या बुद्धे ·
लेखनविषय:
कितीक नवस देवासी बोलती भजती पूजती मनोभावे वाहणारी नदी देव कितीकांची पालक प्राणांची कितीकांच्या उगम डोंगरी अंत सागराशी वाहे दूर देशी असहाय्य? करी कुणी एक त्यात मासेमारी वाळू चोरी करी कुणी एक कुणी तीत करी सुखे जलक्रीडा आणि कुणा पीडा बुडोनिया तितूनच होई विजेची निर्मिती नासाडी पुरती पुरामाजी तिच्या पाण्यावरी वाढतात शेते शुष्क जग होते तिच्या विना सांगा मज आता नदीचे वागणे आमुच्या कारणे असते का? तिचा हा प्रवाह निसर्गे बांधला तसाच चालला युगे युगे आपुल्याच हाती नदीचा वापर शाप किंवा वर ठरतसे तैसे ची हे विश्व देवाने निर्मिले ज्याने वापरले त्याच्या साठी देव माझ्या साठी काही न करतो अलिप्त राहतो

कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
Taxonomy upgrade extras
आता देशावरून आपण कोकणात जावूया अन एक कोळीगीत ऐकूया. शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ || फिरवा सुकाणू सारी जाली भरली मांदेली नगली करली तारली गावली गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला होड्या निघाल्या किनारा ||१|| घेवून दर्याची दौलत हाती विकून होईल कमाई मोठी पडो शिल्लक पैसा थोरा बरा होड्या निघाल्या किनारा ||२|| उभी आसलं माझी बाय पाहत वाट "कवा येईल धनी माझा परतून आज" तिच्या कालजीचा आज होईल उतारा होड्या निघाल्या किनारा ||३|| शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ || - पाषाणभेद कोळी ०३/०४/२०१९

कोरडं रान

पाषाणभेद ·
काव्यरस
किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग चालतांना चाल तुही लचकेदार ग रानामधी धावती हारीणी नाजूक ग सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग पन बोलतांना वठी नाही काही येत ग तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग किती सांगू माझी रामकथा माह्याचं तोंडून ग सारीकडं पावसाचं पानी पन माह्य रानं कोरडं ग - पाषाणभेद ३/४/२०१९

पाहिजे

अन्या बुद्धे ·
लेखनविषय:
मनातले थेट लेखणीतून पाझरले पाहिजे मौनाने अक्षरातून तरी स्पष्ट बोलले पाहिजे गाईलही कधी पाखरू मुग्ध भाव मनातले एकदा देऊन कान आतुर मने ऐकले पाहिजे खडकातही कधी फुटेल कोवळी पालवी ओतून जीव रक्त घाम परी शिंपले पाहिजे भेटेल पांडुरंग आस दर्शनाची धरेल त्याला सोडून देहभान भक्तिमार्गी चालले पाहिजे साहल्यावरी तिचा दुरावा दिवसभराचा भेटण्या स्वप्नात तरी तिने आले(च) पाहिजे -अनुप

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

ज्ञानोबाचे पैजार ·
लेखनविषय:
एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र मग पुढे असं होतं की .. दोन श्वासातले अंतर वाढत जातं. डोळ्यामधली चमक विझत जाते. ओठावरचं हसू निवत जातं... अग्नीचा स्पर्श ही समजत नाही .. आणि नातलग लागतात गुण आठवायला.. कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला .. असं होण्या आधी भरभरून जगायचे.. मृत्यूची सय ही निमित्तमात्र.. पैजारबुवा,

चित्त

अन्या बुद्धे ·
लेखनविषय:
अवयव घेती सुख दुःख भोग जाणिवेचे जग चित्ता माजी चित्त पाही सारे चित्त चव घेई चित्ता गंध येई कवटीत इंद्रिये देतात संवेद संकेत त्यांची काय मात चित्ता विना? चित्त हे सक्षम घडे संवेदन स्वतःतून जाण सुख दुःख चित्ता माजी घडे दुःख आणि सौख्य निवड स्वातंत्र्य आपणासी कळले वळले ज्यास हे, सतत आनंदाचा स्रोत अंतरात -अनुप

डॉक्टर हा निमित्तमात्र..

सोन्या बागलाणकर ·
लेखनविषय:
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र.. (मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून) मग पुढे असं होतं की .. दातामधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधला नंबर वाढत जातो. बोळक्यामधलं हसू निवत जातं... नावं होतात विसरायला.. आणि घरचे लागतात रागवायला.. फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. डॉक्टर हा निमित्तमात्र..

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

राघव ·
लेखनविषय:
काव्यरस
मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं..

काॅफी ही निमित्तमात्र..

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..