Skip to main content

कविता

ढग

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 17/01/2019 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
तोच पाऊस जुनासा गंध हळवा नवासा भिजू भिजू पदराला मखमल स्पर्श हवासा स्पर्श रुते खोल पापण्याशी ओल पुन्हा ऊन पदराला अन एक उसासा उसासलेलं हसू मोरपंखी दिसू काळा करंद ढग डोळा ये जरासा सागरलहरी

स्वात्रंतवीर

लेखक mukund sarnaik यांनी गुरुवार, 17/01/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
लाल,बाळ,पाल,बोस आणि गांधी। देशासाठी लढले हे स्वातंत्रसेनानी।। पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे। त्याने आपले जीवन देशासाठी पणाला लावले।। स्वा.

श्रावण...

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 14/01/2019 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसन्न वारा आणि धरणीचा सुवास प्रफुल्लित मन अन सुखाचा सहवास हिरवागार सडा शिंपडला भुईवरी नक्षत्राचे चांदणे अंथरले नभावरी उडणारे तुषार अन मंजुळ कोकिळ स्वर पक्षाचा आराव अन मन स्वार ढगावर हळवा श्रावण, महिन्याचा राजा श्रावण अनंत निसर्गाची रूपे दाखवतो श्रावण कणा-कणातील संगीताने मेघ व्यापले प्रकृतीच्या काव्याने मन तृप्त झाले निसर्गाच्या किमयेने मन गंधाळले सर्वांना वसुंधरेच्या रूपाने वेडावले
काव्यरस

किंचित अस्वस्थ वाटते आहे !

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 06/01/2019 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे? याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे ! उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे? होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे? काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे? राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे? इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन् उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे? घडत्या घटनांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे किंचिततेचे तुम्हास का भय भेडसावते आहे? संदीप लेले

वेदना जहरी

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 30/12/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी गंध कुणाचा आला दारी अंगणातल्या मोगऱ्याची गेला करुन चोरी वाट कुणाला पुसू त्याच्या गावाची सांगेल कुणी कहानी त्याच्या नावाची होऊन शहाऱ्यांचे भाले रुतले माझ्या उरी पाचोळ्यांच्या रानात फुलली ठिणगी पेटू लागल्या ज्वाला साऱ्या अंगी डोळ्यांत उगवली माझ्या प्रीत प्यारी आठवणींची भरुन येते रात सूर कुणी पेरले या ओठांत सोसते मी एकांताची वेदना जहरी

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 29/12/2018 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली सखे काय सांगू. कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली * घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली अधराने अधरावर प्रेम कविता कोरली सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली * स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले, धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली ना डोळ्यास डोळा.
काव्यरस

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

लेखक नायकुडे महेश यांनी शनिवार, 29/12/2018 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जसे वाळवंटी असे निर्जरा, जसे सागराच्या तळाशी धरा, तसा एक तू जीव या भूवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।। कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला, तया जीवनी एक आधार तू, कुणी वृक्षवैरी न ठावे तुला, करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू, जसा देव नांदे सदा अंतरी ... वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।
काव्यरस

तू काळजाला भिडावे

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 28/12/2018 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
देहास माझ्या स्पर्शताना तू काळजाला ही भिडावे श्वासात श्वास गुंतताना रे उरातले चांदणे धन्य व्हावे बहर माझा नि कहर तुझा क्षणांनी जराशी धुंद व्हावे तू बेभान मी व्याकूळ तरी देहानी जरा किनारा व्हावे पाकळया तू उलगडताना तुझा गंध जरा कुंद व्हावा तू रिक्त कधी, विरक्त कधी मलाही सृजनाचा पूर यावा . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा . . . . 9527460358
काव्यरस

तू काळजाला भिडावे

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 28/12/2018 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
देहास माझ्या स्पर्शताना तू काळजाला ही भिडावे श्वासात श्वास गुंतताना रे उरातले चांदणे धन्य व्हावे बहर माझा नि कहर तुझा क्षणांनी जराशी धुंद व्हावे तू बेभान मी व्याकूळ तरी देहानी जरा किनारा व्हावे पाकळया तू उलगडताना तुझा गंध जरा कुंद व्हावा तू रिक्त कधी, विरक्त कधी मलाही सृजनाचा पूर यावा . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा . . . . 9527460358
काव्यरस

मोबाईलची शेजआरती

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/12/2018 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?