Skip to main content

कविता

प्रेम...

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगा तुम्हाला वाटतं की नाही कुणीतरी आपल्यावर बेहद्द प्रेम करावं तसे आयुष्यात भेटतात हजारो लोक त्यात आपणही कुणाचं विश्व म्हणून जगावं कुणाच्या नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होतात का कुणाच्या तरी आठवणी तुम्हालाही छळतात का नसेल जाणवलं अगदीच तुम्हाला काहीही जरी भरलेल्या डोळ्यातल्या भावना तरी कळतात का कुणीतरी असेलच की तुमच्यासाठीही झुरणारं तुमचे दुर्गुण माहित असूनही भरभरुन प्रेम करणारं अशी आपली व्यक्ती मिळायला लागतं अपार भाग्य . . . तुमच्यावर जो प्रेम करतो तोच तुमच्यासाठी योग्य !

प्रार्थना!

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 07/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता । चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।। हासता यावे मला पाहून इतरांना सुखी भावना माझी नसो सहवेदनेला पारखी या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।। कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।। ~ मनमेघ

एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 05/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत ------------------------------------------------------------ तू शहीद तिकडे देशासाठी इथे दुःख माझिया उरात एकेक स्वप्नाची राखरांगोळी मन आसवांच्या पुरात स्फोटाचा एकच दणका साऱ्याचे तुकडे तुकडे कुठे चिरफाळले देह कुठे विच्छिन्न मुखडे अग्नी दिला तरीही तुला डोळे शोधती धुरात कपाळाचं पुसलं कुंकू पदरात कच्ची बच्ची सांत्वनांचा काय दिलासा ही एकच गोष्ट सच्ची पुन्हा कधीही तुझी पाऊले ना वळणार या घरात न बलिदान हे जावो व्यर्थ या बलिदाना येवो अर्थ या देशाची सारी जनता लढण्या आहे समर्थ आपण सारे एक म्हणा रे सूर मिळवूनी सुरात बिपिन सांगळे

(धागा काढण्याची तल्लफ)

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 03/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी चरणी समर्पित ... डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला वाचण्यातील साधेपणा संपू लागला तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच.... तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा आशयाची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला हेतूच दिसेनासा झाला ! धागा काढल्यावर चर्चा होईलच हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा उगाचच हसे होताना, होउ द्यावे मुळातच धागा बदबदा काढू नये वाचकांना कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये..... धागा काढण्याची तल्लफ मात्र.....?? तल्लफ काही माझ्या आधी

सोबती

लेखक अन्या बुद्धे यांनी शुक्रवार, 03/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मनापासून बोलतो मनापासून ऐका वागावे कसे माझ्याशी फिटतील सर्व शंका चाललो पुढती तरी त्यात ना अर्थ काही नका येऊ मागुती मी कुणी नेता नाही तुम्ही पुढे मी मागे चित्र असे दिसले जरी मी नव्हे अनुयायी गोष्ट ही आहे खरी रहा आसपास माझ्या मार्ग चालू सोबतीने परस्परांचे मित्र होऊ जोडुनी आपली मने -अनुप

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

बिज्जी लेखिकेची आळवणी

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 29/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!) बिज्जी लेखिकेला असे घाई भारी मिटिंगा लई सुप्रभाती, दुपारी बिज्जी लेखिका ती भुसनळी पेटलेली कुणी त्रास देता ठासते आग 'खाली' स्वयंपाकही तो पाचवीं पूजलेला शिव्या मोजिते पाहता ती घड्याळा तिची नाटिका जी प्रेक्षकां झालि प्यारी सदोदीत टाळ्या फुल्ल तिकिटांचि बारी प्रयोगास येती मोठमोठे असामी पाहता लेखिकेला 'मुग्ध' होती प्रणामी फोनावर फोन 'मागणी' घालणारे (टीप: प्रयोगाची मागणी.

(बंद डब्याच्या झाकणाआडची कोशिंबीर)

लेखक शब्दसखी यांनी शनिवार, 27/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
(सगळ्यांनीच कीबोर्ड सरसावलेत... म्हटलं आपण कशाला मागे राहा... :-) बाकी शिवकन्या तुमचे आभार!!) सकाळी डब्यात भरलेली कोशिंबीर बघते आहे झाकणाआडून बाहेर... किती बाहेर?? टेबलावरच्या डब्याच्या बाहेर शेजारच्या खुर्चीत बसलेल्या त्या माणसाकडे .... ज्याने सकाळी उत्साहाच्या भरात डाएटच्या नादात भरली होती तिला डब्यात.... करत राहते ती विचार की पाळेल का तो डाएट आजतरी... घेत राहते ती वास त्याने दिवसभर खाल्लेल्या अबरचबर पदार्थांचे.... सामोश्यांचे... आणि वेळी अवेळी प्यायलेल्या कॉफीचे... कोशिंबीर डब्यातून बाहेर येऊ शकत नाही.. त्याला सांगू शकत नाही की अरे मी आहे इथेच... बघ जरा...
काव्यरस

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

बियर

लेखक सोन्या बागलाणकर यांनी मंगळवार, 23/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....