Skip to main content

कविता

असे षंढ आम्ही कैसे निपजलो

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 19/02/2019 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो... पुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो || पण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || सायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली || पोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || स्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने || स्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || ज्ञानातुकयाची, शिकवणी व्यर्थ गेली | स्वार्थाने आमुची, मती अंध केली || आम्ही बाजीरावाची, जात शोधित बसलो | असे षंढ आ
काव्यरस

ते दोघे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 16/02/2019 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

आजही...

लेखक नायकुडे महेश यांनी शुक्रवार, 15/02/2019 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही वेड्या मनाला याद येते तिची आजही ओल्या सरीतून साद येते तिची आजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। आजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी आजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी आजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या आजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या ।। महेश नायकुडे
काव्यरस

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 09/02/2019 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम

ऋतू !

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 08/02/2019 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतू ! हा एवढा ऋतू संपल्यावर काळोखातल्या गारठ्यामध्येच निघेन मी ! .... दूरच्या गावात जाण्यासाठी .... अंधारात स्तब्ध पणे उभ्या असलेल्या तुझ्या गावातल्या, या झाडांना निरोप देऊन ..... या झाडांकडूनच शिकलीये बरंच काही ....... सगळे ऋतू एकाच जागी उभे राहून झेलायचे .... इतरांना हवंय म्हणून बहर दाखवायचा अन स्वतःला हवंय म्हणून टिपं पण गाळायची..... श्रावण असल्याचे निमित्त करून ..... . उन्हाळ्यात, क्वचित दुरून येणारा थंड वारा 'तुझ्याकडूनच' आला आहे असं समजून पानांची सळसळ करून झेलायचा...... त्या स्पर्शाने नकळत शहारून घेतल्यावर त्याला समुद्राच्या लाटांमध्ये सोडून घ्यायचं .....

स्वप्नांची गोष्ट (गझल)

लेखक कहर यांनी सोमवार, 28/01/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क

तुझ्या कवितेची ओळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 21/01/2019 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते जिंदगीच्या निवडुंगा इवलेसे फूल येते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटते तुझ्या कवितेची ओळ अवचित ओठी येते पाखराच्या लकेरीने हिर्वी वेल थर्थरते कवितेची ओळ तुझ्या पुन्हा पुन्हा ओठी येते पुन्हा पुन्हा रुजूनिया पुन्हा पुन्हा उगवते
काव्यरस

भाऊ बहिण नाते

लेखक mukund sarnaik यांनी शनिवार, 19/01/2019 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
बहिण भावाचं नातं भांडणारं तर कधी रुसणारं। सुखदुःखांमध्ये एकमेकांना साथ देणारं।। बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन। याच नात्याला जिवापाड जपणारं हळवं असतं मन।। भांडण, रुसवेफुगवे तितकीच असते माया। भाऊ - बहिणीच्या नात्यांमध्ये नेहमी दिसतो गोडवा।। ताई असते दुसरे आईचेच रुप। भावाला देते ती मायेची ऊब।। राखी बांधून भावाला बहिण नातं घट्ट करते। बहिण-भावाच्या नात्याची ती हळुवार जपणूक करते।। भावाच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते। त्यात तीला कुठल्याचं गोष्टीची अपेक्षा नसते।। असे निरागस नाते बहिणभावाचे। मायेच्या हिंदोळ्यावर ते सदा फुलतं रहावे।।

देव्हारा

लेखक कहर यांनी शनिवार, 19/01/2019 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा
काव्यरस

तुझी कविता

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 18/01/2019 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या