मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

नळ आणि सुंदरी

ऋषिकेश ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नळावरच्या लायनीत काल जावच लागलं पुरषासारखा पुरुष असुन .. त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी र्‍हाली तीचं करुन करुन माय कमरंत वाकली आज मग बाबुला उदबत्या विकाया धाडलं आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं इतक्यात ती समोरुन जणू तरंगत आली... मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता.. सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत... हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळलं व्हतं... पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता.. काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला हो

घरटे..

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घर ते माझे बालपणीचे रंगबिरंगी आठवणीचे.. आईबाबांच्या पंखाखाली मांडलेल्या भातुकलीचे.. प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी वेल जुईची बहरली होती.. सैरवैर त्या अंगणी माझी इवली पाऊले नाचली होती.. झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. एकेक पायरी यशाची ती चढले ज्याच्या बळावरी.. घर ते माझे उभे पाठीशी उनपाऊस घेत शिरी.. कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी

कमळाबाई

चित्तरंजन भट ·
लेखनविषय:

कर्नाटकची राणी व्हाया  हरखुन गेली कमळाबाई;
मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !


पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई


ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !


बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई


धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उन्हाळ्यातले थेंब (तिहेरी तिहाई)
* तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची * * *
* * लाल धूळकण वाहातायत सैरभैर खार तुषार * *
* * * ऊन धुळीत थेंब कोळपली पालवी वाफवून मलूल करतात *
* दवाचा एक बिंदू पानाला लोंबतो तसा जड नाही तो * * *
* * मागे ठिबक ठिबक समोर

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष ·
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

पांढरपेशी कविता

ॐकार ·
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

फुलराणी...

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
इवलिशी कळी दवांत निजली.. चिंबचिंब भिजली लाजेत थिजली... पाहूनी तिजला भ्रमर सावळा आळवित जाई राग आगळा.... प्रेम तिजवर जडले तयाचे नियम त्याने मोडले जगाचे... रूणझुण त्याची वेड लावती गंधित होई वेडी कळी ती.. लाल गुलाबी रंग कोठला केशरी अबोली अंतरी दाटला... फुलविण्या तिला झपाटला तो सुंदर फूल हे म्हणतो जो तो... राजकुमारी..ती. येई हासत फुलांस त्या मग नेई सोबत... भ्रमराची त्या मग प्रेमकहाणी फुला विना त्या झाली विराणी बागेमधूनी शोधित त्या फुला फिरतो वेडा भ्रमर एकला.. भ्रमर एकला.... - प्राजु.

तिचा रुमाल

मनिष ·
लेखनविषय:
जो दरवळायचा कधी तिच्या गंधानी तो भिजत राहतो आता माझ्या आसवांनी तिचा तो धुंद, मंद गंधही नाही तिचा तो हळुवार स्पर्शही नाही तिचा तो मधात भिजवलेला आवाजही नाही हुरहुर लावणारी, काळीज चिरणारी तिची ती नजरही नाही फक्त तिच्या आठवणींचे धागे जपत, माझ्यासारखा आरवार होतो, माझ्या आसवांत भिजत राहतो; तिचा रुमाल……. ती तोडून जाईल सगळे धागे तिचा गंधही उरणार नाही मागे तिला कळणार नाही माझी वेदना ती ऎकणार ही नाही माझे रडणे ती विसरुन जाईल शपथा वचने विसरुन माझ्या स्पर्शाची थरथर ती होईल त्याच्या स्पर्शासाठी आतुर माझ्यासारखा आरवार होईल, माझ्या आसवांत भिजत राहिल; तिचा रुमाल……. - मनिष
ही कविता आधी

मी!

अशोक गोडबोले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ना शोधितो किनारा ना धुंडितो निवारा मी धुंद वादळाशी अविराम झुंजणारा चुंबावया नभाला झेपावतात लाटा उद्दाम कालियाचे शिर मीच ठेचणारा दर्या अथांग माझी टाकी गिळून नाव तेजाळ रत्नगुंफा तिमिरात शोधणारा आयाळ पिंजणारा झोंबे पिसाट वारा दुर्दम्य निश्चयाचे मी शीड रोवणारा धावून ये घनांची रणधुंद मत्त सेना मी नेत्र शंकराचा अंगार ओकणारा आभाळ फाडुनी ये बिजली कडाडणारी नी निग्रही ध्रुवाशी रणनाळ जोडणारा --अशोक गोडबोले, पनवेल.

उद्या सकाळी

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माझ्या या मराठी सुनीताच्यापुढे त्याचा इंग्रजी अनुवाद दिला आहे. तिथे उपक्रमावर अनुवादाविषयी चर्चा चालू आहे, त्याचे उदाहरण माना पाहिजे असल्यास. हा परायत्त भावानुवाद आहे.