उन्हाळ्यातले थेंब (हायकू)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उन्हाळ्यातले थेंब
(तिहेरी तिहाई)
*
तापली धूळ बसून
पानावर नक्षी दिसते
सुकल्या दवाची
*
*
* |
*
*
लाल धूळकण
वाहातायत सैरभैर
खार तुषार
*
* |
*
*
*
ऊन धुळीत थेंब
कोळपली पालवी वाफवून
मलूल करतात
* |
*
दवाचा एक बिंदू
पानाला लोंबतो
तसा जड नाही तो
*
*
* |
*
*
मागे ठिबक ठिबक
समोर ओढ्याचे पात्र
आहे भेगाळ
*
* |
*
*
*
ऊन धुळीत थेंब
चुरचुरून वाफ झालेले
मातीचे मोती
* |
*
सूर्य उगवला
दवाची उठलेली वाफ
कोरड पांघरते
*
*
* |
*
*
निरभ्र निळे
नभ भगभगते
मृद्गंध उठला
*
* |
*
*
*
ऊन धुळीत थेंब
आषाढ दरवळतो
भर वैषाखात
* |
*****************************************************
Summer Droplets
(Triple triplets)
*
The hot dust settling
Traces patterns on leaves
Of long dried dew
*
*
* |
*
*
Red dust particles
Swirl helter skelter
Spraying embers
*
* |
*
*
*
Sprinkles on hot dust
Steam up the browned trees
The leaves wilt more
* |
*
A drop of dew
Hangs from a leaf tip
Too light to drop
*
*
* |
*
*
Drip drip somewhere
Here the brook's bed
Is cracked earth
*
* |
*
*
*
Sprinkles on hot dust
Sizzle and hiss and steam
Rolling brown pearls
* |
*
The sun arisen,
The dew is misting up
The parched scene
*
*
* |
*
*
A cloudless blue
Smoldering hovers above
An earthy fragrance
*
* |
*
*
*
Sprinkles on hot dust
Smell of cool monsoon
And dampen summer
* |
*****************************************************
(हायकू हा जपानी काव्यप्रकार शांताबाईंनी आणि अन्य कवींनी मराठीत रचला आहे. येथे मी मूळ जपानी नियमांप्रमाणे रचना करतो आहे, त्यामुळे काही फरक आला असू शकेल. यात जास्तीत जास्त ३ ओळी असतात, आणि १७ मात्रा असतात. स्वयंपूर्ण कडव्यात केवळ मूर्त नैसर्गिक विषय हाताळले जातात. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. तरी वाचकाच्या अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात. काही भाषांतरे मराठीतून इंग्रजीत आहेत, तर काही उलट दिशेने.)
वाचने
23250
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
कोरड पांघरते !!!
सुंदर
सुरेख
कविराज, शब्
In reply to कविराज, शब् by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
काही भाग थोडे मोजून बेतशुद्ध आहेत हे खरे
मातीचे मोती
सुरेख
धन्याशेठ,
In reply to धन्याशेठ, by विसोबा खेचर
+१
In reply to +१ by बेसनलाडू
अरे बेसनाच्या लाडवा,
In reply to अरे बेसनाच्या लाडवा, by विसोबा खेचर
हम्म
In reply to हम्म by आजानुकर्ण
येथेही +१
वाह!
अप्रतिम
धनंजय पंखा परिवार
In reply to धनंजय पंखा परिवार by विसुनाना
अगदी असेच
हायकु.....मस्त !
आवडल्या.
एकदम भारावून
In reply to एकदम भारावून by धनंजय
पण आपले संशोधन विसरू नका !
अप्रतिम
भावगर्भ साक्षात्कार - पुढची पायरी
In reply to भावगर्भ साक्षात्कार - पुढची पायरी by राजेश घासकडवी
मानल!
In reply to भावगर्भ साक्षात्कार - पुढची पायरी by राजेश घासकडवी
भारीच की राव!
मस्त
बावनकशी सोनं! भारीच! आपणही
छान हायकू आहे.
ता क
vaakhusaaaa.
बाप रे
उल्का तुम्ही फार सुंदर धागा शोधुन काढलात
In reply to उल्का तुम्ही फार सुंदर धागा शोधुन काढलात by मारवा
धन्यवाद!