मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

होईल कधी गे भेट ?

स्वानंद मारुलकर ·
काव्यरस
होईल कधी गे भेट ? कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट ओझरते मी तुला पाहिले थार्‍यावरचे चित्त उडाले मनोरथांचे चढले इमले क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत ओठांवरती शब्द न येती मनात पण पाझरते प्रीति परतून जेव्हा पडेल गाठी नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत एकच आशा येशील गे तू जुळतील धागे जुळतील हेतू केव्हा होईल भेट परंतू अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

गुड बाय !!!

अनुप्रिया ·
लेखनविषय:
मी जाते आहे आता कायमची.... गुड बाय !! असं म्हणून मी बाहेर तर पडले पण मनात प्रश्न घोंघावतायत.... जायचं कुठे? करायचं काय? हे असं लपलपणा-या नजरांनी पहाणारं जगं जगू देईल? प्रश्नांची घोंघावती वादळं उत्तरांची चलबिचल.......

सख्या...

अथांग ·
लेखनविषय:
सलील कुलकर्णी यांचे - 'सखे कसे सांग तुला, अगदीच नाही भय' हे ऐकले आणि त्याची धून डोक्यात चांगलीच भिनली. पुढची कविता त्याच चालीवर सुचली. ती वाचताना प्रत्येक वेळी माझ्याकडून ह्याच चालीवर म्हंटली जाते. सख्या कशी सांगु तुला मनाची या हुर-हुर.. दाह याचा सोसु कसा ? तू ही असा दूर-दूर... मृगजळासम भासे कधी तुझा सहवास, तापुनही मग थंड, माझे अगतिक श्वास... घेऊनिया पंख नवे, स्वप्नदेशी उडे मन, एकलेच मागे फ़िरे, आणि हरवून भान... रानातील पायवाट, करु लागे खाणा-खुणा, देह नवा पांघरोनी, पळू लागे मी ही पुन्हा.. थकुनिया जेंव्हा मग, होते काळीज हे चूर, भिरभिर भटकुन, अंती डोळा महापूर !!!!

नातं

आदिजोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसापूर्वी विलेपार्ले को.ब्रा. कट्ट्याच्या वार्षीक संमेलनात नातं ह्या विषयावर एक छोटासा प्रोग्रॅम केला. 'नातं' ह्या विषयाचा विविध अंगांनी विचार करून एक छोटासा कार्यक्रम सादर करायचा होता. माझ्याच काही नव्या जुन्या कविता मिळून साधारण १५ मिनिटांचं काव्य वाचन केलं. त्यातल्या काही कविता वगळून बाकिचं लिखाण इथे देतो आहे. ----- नातं हा फार अजब प्रकार आहे. अजब अशासाठी की मानलं तर नातं नाही तर निव्वळ ओळख. रक्ताची माणसं सोडली तर बाकीची सगळी नाती जोडलेली असतात. नातं कुणाशीही असू शकतं. पावसाशी, मातीशी, अगदी जुन्या डायरीशीही. आज आम्ही अशीच काही वेगळी नाती बघणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने.

उन्हाळी दुपार...

वैभव देशमुख ·
लेखनविषय:
उन्हाळी दुपार सुस्तावले रान मुके पानपान जाहलेले आंब्याच्या पानात पाखरे गुडुप मेंढ्यांचा कळप आंब्याखाली बाभूळ झाडाची फाटकी सावली तेथे विसावली गुरे काही सुक्या नदिकाठी नग्न उभे साग आकाशात आग लागलेली कुणी एक बाई सरपण शोधात लेकरू पोटात वाढताना... - वैभव देशमुख

माहीत नव्हतं...

अथांग ·
लेखनविषय:
नशीबाला दोष देता देता नशीबाचा कौल घेता घेता, नशीबात तू पण असणारेस..... माहीत नव्हतं ! खडतर पायवाट तुडवत जाता काट्यांना त्यावर चुरडत फिरता, फुलासारखं तू जपणारेस..... माहीत नव्हतं ! अस्ताव्यस्त आयुष्य विखरता कणा-कणाने झुरता-झुरता, आपसुक, अलगद सावरणारेस..... माहीत नव्हतं ! आत खोल काहीसं तुटता मरत-मरत जगता-जगता, श्वास होऊन तारणारेस....... माहीत नव्हतं !!!

फसू नका तुम्ही फसू नका

पाषाणभेद ·
काव्यरस
फसू नका तुम्ही फसू नका
विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| लांब दाढी कपाळी टिळा बोटात अंगठ्या गळ्यात माळा समोर पोपट चिठ्ठी काढतो त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय? अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका फसू नका तुम्ही फसू नका ||१|| देई गंडा ताईत दोरा अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा

माझ्या झोपेची झाली आता येळ

पाषाणभेद ·
काव्यरस
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी ज

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

पाषाणभेद ·
काव्यरस
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर? शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ|| निसती मिरची कुट ग जरा तीचा खर्डा कर ग चवीला बरा भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१|| त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा लाव भाकरीला एक हात लोण्याचा घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं लवकर टाक त्यात उलीसा गुळ श

कधीपासून ?

अथांग ·
लेखनविषय:
कवितेला नाव देण्याची (ठेवण्याची) आमच्यात प्रथा नाही, पण इथे आपली चार अक्षरं प्रकाशित करायची म्हणजे तिचे आधी नामकरण करणे आवश्यक असल्याने ही नवी कला आत्मसात करायच्या प्रयत्नात आहे. जिथे काही नाव सुचणार नाही तिथे कवितेची पहिली ओळच शीर्षकात घालावी म्हणते.