लेखकअथांगयांनी बुधवार, 29/09/2010 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी कुसुमिता ची 'ती' वाचली, आणि शेवटचा प्रश्न छळत राहीला - 'स्त्री' आहे ती आता, आता तिच्या स्वप्नांवर तिचा काय हक्क? वाटले याच्याही पुढे काहितरी असावे.
लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी मंगळवार, 28/09/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाही वाटत, की
मी कधी कुणाच्या उपयोगी पडेन !
पण मिळालीच मला संधी
पाय घालून पाडण्याची कुणाला
तर मात्र ...
मी नक्की पाडेन त्याला
कारण .....
एवढं तरी
केलं पाहिजे आपण
कुणासाठी तरी
असं नेहमी वाटतं मला
एक माणूस म्हणून.....!!
लेखकस्वप्निल मनयांनी मंगळवार, 28/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधी येशील तू?
मी तुझी वाट बघतोय
आभाळ भरून आलंय
ढगही गडगडताहेत
माझ्या मनातला टाहो
जणू तेच व्यक्त करताहेत
बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय
तु नाही आलीस तर
लवकरच ते रडायला लागेल
त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल
पण मी रडणार नाही
त्याला साथ देणार नाही
आणि
जर आलच रडायला तर
सरळ पावसात भिजत राहीन
कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही
कारण
माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं
मला सहन होणार नाही
लेखकअथांगयांनी मंगळवार, 28/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वळणे,
कधी पाऊस, कधी जळणे...
काही नाती ओली-हळवी-
काही फक्तं दळणॆ !
कित्ती सारे मोसम आलेले,
भोगलेले, क्वचित – उपभोगलेले...
काही फुले फुललेली तनात –
काही करपून गेलेले !
तरी पण पुढच्या क्षणात,
क्षणातील एक-एक कणात...
खूप काही जपण्याचे –
पण मनातल्या मनात !
आयुष्यातील वळणे,
कधी पाऊस, कधी जळणे...
काही कोडी सुटल्यासारखी, अन..
काही कधीच न कळणे...
कधीच न कळणे !!!
लेखकअथांगयांनी सोमवार, 27/09/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे किती-कसे,
उभे आडवे वळसे..
भाव ओथंबले त्यात,
ओठीं काही येत नसे !
हो, डोळे बोलतात कधी,
भाषा एक साधी-सुधी..
ज्याची त्याला समजावी,
कुणी-कुण्णी नको मधी !
काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे...
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे !
क्षणी असे हरवणॆ,
आणि पुन्हा गवसणॆ...
तुझी-माझी लपाछपी,
सार्या गावाचे बहाणे !!
लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव
भक्ताचा भुकेला
वारकरी मेला
वारीतच
विश्वात्मक ऐसे
इथे काही नाही
तुच तुला पाही
आत मध्ये
तुझ्या अस्तित्वाचा
एकच पुरावा
मी पणा पहावा
अंतर्यामी
अंतर्यामी घ्यावा
शोध ज्याचा त्याने
विचार स्पंदने
निरिक्षावी
सांडे अहंकार
वासना विकार
जेव्हा निर्विकार
पाहसी तू...!!