उन्हाळी दुपार...
लेखनविषय:
उन्हाळी दुपार सुस्तावले रान
मुके पानपान जाहलेले
आंब्याच्या पानात पाखरे गुडुप
मेंढ्यांचा कळप आंब्याखाली
बाभूळ झाडाची फाटकी सावली
तेथे विसावली गुरे काही
सुक्या नदिकाठी नग्न उभे साग
आकाशात आग लागलेली
कुणी एक बाई सरपण शोधात
लेकरू पोटात वाढताना...
- वैभव देशमुख
वाचने
1699
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
वा वैभव अगदी चित्रमय कविता. गावाच्या आठवणी जाग्या केल्यात भाऊ!
>> बाभूळ झाडाची फाटकी सावली
तेथे विसावली गुरे काही >>
सुंदर चित्रमय कविता.
धन्यवाद..
शेवटचे कडवे ह्रदयस्पर्शी आहे.
धन्यवाद !
वा वैभव अगदी चित्रमय कविता.