माहीत नव्हतं...
लेखनविषय:
नशीबाला दोष देता देता
नशीबाचा कौल घेता घेता,
नशीबात तू पण असणारेस.....
माहीत नव्हतं !
खडतर पायवाट तुडवत जाता
काट्यांना त्यावर चुरडत फिरता,
फुलासारखं तू जपणारेस.....
माहीत नव्हतं !
अस्ताव्यस्त आयुष्य विखरता
कणा-कणाने झुरता-झुरता,
आपसुक, अलगद सावरणारेस.....
माहीत नव्हतं !
आत खोल काहीसं तुटता
मरत-मरत जगता-जगता,
श्वास होऊन तारणारेस.......
माहीत नव्हतं !!!
वाचने
1076
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
माहीत नव्हतं या ऐवजी सोबत हे शिर्षक अधीक योग्य होतं असं वाटतं. अर्थात मुलगी तुमची. बारसं तुम्हीच करा!
कवितेत व्यक्त झालेय, ते त्या क्षणी जाणवलेले आहे. त्यापुढे त्याची सोबत आहे की नाही याची कल्पना नसल्याने ते नाव कसे वाटेल माहीत नाही. "वाचवणारा/जाणीव देणारा" नेहमीच "सहप्रवासी/सोबती" असतोच असे नाही. अर्थात मी आधीच सांगितल्याप्रमाणे मला खरंच कवितेला नाव द्यायला सुचत नाही. त्यामूळे आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे.
मला कविता वगैरे काही समजत नाही..पण हि कविता आवडली..
सकारात्मक छान कविता
माहीत नव्हतं या ऐवजी सोबत हे