Skip to main content

कविता

अमेरीकन भ्रमनिरास

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 17/02/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतात दिवस ..काही दिवसांपुर्वीचे.. नाही काही वर्षांपुर्वीचे कीती प्रफ़ूल्लीत होते ना मी ? अमेरीकेला जायच म्हणून.. उधान आल होत .. आनंदाला लग्न ठरल होत ना माझ , सगळीकडे आनंद उत्सव चालू होता मी हे बघणार, मी येथे जाणार मी हे करणार, मी थोडीशी अजून शिकणार.. सगळी स्वप्न पदराला बांधून निघाले होते मी जाताना मावेल तेव्हडा माझा 'भारत' साठ्वून घेऊन चालले होते मी .. मनात.. ह्रदयात.. पाउल ठेवले ना मी त्या स्वप्नमय दूनियेत सगळे वेगळेच दिसले मला माणसे .. (हसून) छे मशीन म्हणायच त्यांना भ्रमनिरास.. फ़क्त भ्रमनिरास.. मग साठवलेला 'भारत' आठवत होते मी .. हळू हळू काही दिवसांनी ..
काव्यरस

किती दिवस झाले माहेराला गेले नाही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आज वेळ मिळाला म्हणून लगोलग दोन कविता डोक्याला दोन कवीता सुचवू दिल्यात. (आपल्यावर होणार्‍या अन्यायाबद्दल क्षमस्व.)
किती दिवस झाले माहेराला गेले नाही
काव्यरस

याहो याहो पाव्हणं तुम्ही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
याहो याहो पाव्हणं तुम्ही
याहो याहो पाव्हणं तुम्ही जरा जवळ बसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||धृ|| दिवसा र्‍हाती तुमची घाई जरा बोलाया वेळच न्हाई कसं व्हाव मग मन मोकळं नका वेळ वाया घालू फुका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||१|| मी बाई राही एकटी घरात दिस सरून जाई सरेना रात सोबतीला तुम्ही याहो तग धरला कसाबसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||२|| थोडं मी बोलते थोडं तुम्ही बोला दिसभराची ख्याली विचारा रात आपलीच आहे विसरू नका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही
काव्यरस

आकाशातील मी घन काळा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 15/02/2011 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी आज बरसून गेलो आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जन्मण्यास पुनश्च देह माझा नदीसागरात विलीन झाला --------- शब्दमेघ ( २००७)

मी माझ्यात बंद ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 14/02/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
[सर्दीने अचानक बेजार झालो होतो. खूप दिवसांनी अशी जीवघेणी सर्दी. डोके सुन्न .कान बधीर मन कासावीस . आणि अचानक जाणवले की हे सुन्नपण मस्त वाटतेय. ऐकू येत नाही .छान वाटतेय. हा कोलाहल हा गोंधळ दुरून बघतोय. मी माझे तात्पुरते सुन्नपण एन्जोय करीत होतो.तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न ] डोके सुन्न ....! बधीर ….!! सर्दीने हैरान ....!!! काहीच ऐकू येत नाही झाडाची पाने हलत असतात कावळे कावकाव करीत झाडावर बसलेली मला त्यांच्यां चोची फाकलेल्या दिसतात पण आवाज येत नाही ऐकायला मी सुन्न बधीर...!
काव्यरस

मैत्रीचे गणित -

लेखक विदेश यांनी रविवार, 13/02/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस

'च'

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 12/02/2011 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
'च॒' हिच्या॒त च, तिच्या॒त च ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥ च॒ळवळीत च मोर्च्या॒त च वच॒ननाम्यात च प्रचा॒रात च खुर्ची॒त च बाचा॒बाची॒त च राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥ भ्रष्टाचा॒रात च लाच॒खोरात च चा॒रा घोट्याळ्यात च जकातीच्या च॒लनात च बच॒त गटात च ब्यांकेच्या चे॒कात च चा॒लू खात्यात च पैशांशीही 'च' चे खूप छान जमते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥ च॒कलीत च च॒टणीत च चि॒वड्यात च चा॒ट मसाल्यात च चिं॒चेत च चि॒कण्या सुपारीत च जीभेच्या चो॒चल्यात च च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते 'च' अक्षर देशा
काव्यरस

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव

लेखक शरद यांनी शनिवार, 12/02/2011 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न. अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही?

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.