Skip to main content

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही. रतिबी धागे जेंव्हा डोक्यात जातात, आणि पाठ खाजवणारे आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा डायरीची आठवण अनावर असते... जुनीच दारू जेव्हा नव्या बाटलीत अवतरते, जुनेच स्कोर आठवून जेव्हा सेटल करत बसते, कस सांगू तुला तेव्हा कंपुबाजांची आठवण अनावर असते... लेखनकंडु जेंव्हा जागे होतात, एकोळी धाग्यातही ज्ञानेश्वरीचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा अवांतराची आठवण अनावर असते... आता मीही शिकणार आहे साध्या प्रतिक्रीयेला अवांतर बनवायचं, दोन आयडी काढून निभावुन जायचं, पण कस सांगू तुला , तेव्हा पण मालकांची खरड हजर असते.. एकच सांग नि एकदाच सांग, तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??
लेखनविषय:

वाचने 4206
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) पर्‍या भाड्या ... तुझ्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली रे =)) :)

In reply to by टारझन

तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली. तशीच ताकद मला इथेही दिसली होती.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुझ्या कवितेत आणि टार्‍याच्या प्रतिसादात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली.
हम्म! पुप्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

चर्चा अपेक्षेप्रमाणे योग्य मार्गावर असल्याचे पाहून मंडळाचे झेंडे अटकेपार लागले असतील....

यमक, उकार, आकार, राग, मात्रा, मीटर सोडून बाकी सगळे ठिक आहे. माननीय परा, प्रयत्न करने सोडु णका. वाळुचे कण रगडत रहा, तेल णक्की गळेल. (एखादी कविता भिकार झाली म्हणुन काय झाले. अजुन एक ट्राय मार. हे ह.घे)
एकच सांग नि एकदाच सांग, तुला आशी मालकांची खरड कधी येतच नाही का रे??
कसे सांगु, लाज,षरम, भीती एकाच वेळि वाटायला लागतात.

लगेच मस्त विडंबन पण केली की आपण.... सही.. ...

काय पण विडंबन मांडलय !लगे रहो !

चालू द्यात तुमचे @#$%^&* धंदे! ;-) विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन आवडलं रे. आता लिखाळला फोन कर, आणि त्याला त्याची शब्दांची वही घेऊन विडंबनाचं रसग्रहण लिहायला सांग.
नानाला पुढच सावज गावलं. ;)

In reply to by गणपा

नानाला पुढच सावज गावलं. गणपासारखेच म्हणते,पण तो लिखाळ हल्ली कुठंच दिसत नाही.. परा, विडंबन झकास.. स्वाती

वा, वा, आपल्या कवितेत उद्याच्या शरदिनीतै दिसल्या :). बाकी कवितेला 'अवांतरापुरती प्रतिक्रिया' हे शीर्षक चालेल का?(...भिन्नटायटलमधून)

In reply to by नंदन

'अवांतरापुरती प्रतिक्रिया' >>> नंदोपंत , चुकुन ' अत: पुरातील प्रतिकिया ' असे वाचले आणि मिपागृहातील अत:पुरात कोणा-कोणाला वाहवुन न्यायच सामर्थ्य आहे हे आठवल ..असो @परा ..भन्नाट !!

विडंबन एकदम आवडलं

सह्ही :)

रतिबी धागे जेंव्हा डोक्यात जातात, आणि पाठ खाजवणारे आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा डायरीची आठवण अनावर असते... लेखनकंडु जेंव्हा जागे होतात, एकोळी धाग्यातही ज्ञानेश्वरीचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा अवांतराची आठवण अनावर असते... क्या बात है!! परा, परा, लेका ठणठणपाळ का नाही रे झालास? :)

अवांतराची त्याना कधी तमा नसते. स्वतः धाग्याचा ख फ केला त्याची जिम्मा नसते कोण्या अ कंपुबाजानी काही लिहिले तर त्याला क्षमा नसते. मी लिहितो/ते तेंव्हा ते साधेच असते दुसए कोणी लिहीते तेंव्हा ते मात्र गैर असते. एका बेसावध क्षणी कोणाची काय मर्जी होते. बिचारा अ कंपुबाजाची क्षणात हत्या होते

चांगले विरजण लावलेत हो!