Skip to main content

कविता

कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 28/01/2011 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य हे क्षण ..! उत्साह संपून सारे गोठून जातात आनंदाचे क्षण नि ... कशे आठवत राहतात प्रेम तुटल्याचे क्षण सरळ नकार त्याच्या मर्दपणाची बेदम हार ..!! हातात हात घेऊन ते बसलेले ते निवांत क्षण कुठे गहाळ होतात ...? आणि त्या आणा भाका प्रेमाच्या क्षणभर मिठीत विरघळून गेलेले ते हळुवार क्षण तो स्पर्श ती बेहोष नजर मोहित होऊन स्वताला विसरून गेलेले क्षण कितीतरी काळ लोटला हरवून गेला आठवण आली की भळभळते जखम .... एक ओली तिची आठवण .... कालच ती स्वप्नात आली जशीच्या तशी नि मग तो विसरून गेला ते उदासपण क्षणभर.......
काव्यरस

स्वप्नांचे पान मुंबई

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे
काव्यरस

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 26/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला फार जुनी झालीय हकीगत जाहिरात आली होती [आठवतंय का ..?] चंद्रावर जमीन मिळतेय तेव्हाच घेऊन ठेवलीय दहा रुपये एकरने चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय माझ्याकडे कागद पत्र आहे कालच चंद्राचा सेल आला बंगला बांधून तयार आहे कधी येताय राहायला ..? हुरळून गेलो कसा असेल बंगला चंद्राने "ई"मेल केलाय . मस्त बंगला..!
काव्यरस

नेते नरमले

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे =============

रावणाला कोणी मारला ?

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/01/2011 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म
काव्यरस

एका झाडाचा मृत्यू ..[?]

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 25/01/2011 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रचंड पिंपळ झाड खूप जुने पुराने माझ्या लहानपणापासून जसेच्या तसे तरणे बांड सतत फुलत आपल्याच नादात हरवून स्वप्नात पाखराना आपल्या मांडीवर खांद्यावर जोजावत कित्येक पाखरांच्या पिढ्या त्याच्या खांद्यावर जगल्या ,वाढल्या, हरवून गेल्या दरवर्षी त्याला पालवी फुटते तारुण्याची झळाळी सोनसळ भूषवित आपल्याच तोर्यात आत्ममग्न ..!! तो उभा आहे मठात जुन्या वाड्यात त्याचा भोवती बांधून कट्टा किती पोरे म्हातारी झाली माणसे बदलली पिढ्या बदलल्या हां आपल्या दिमाखात उभा परवाच वाडा पाडून टोवर बांधायचे ठरवलेय पिंपळाच्या मुसक्या बांधून ठेवल्यात दोरखंडाने शुभमुहूर्त बघून त्याला फासावर
काव्यरस

स्वप्न

लेखक नाहिद नालबंद यांनी रविवार, 23/01/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते हाती हात एकमेकांचे बोटात बोट गुंफले होते नयनांशी नयन दोघांचे काहीतरी बोलले होते घेता जवळी साजणाने लाजूनी शहारले होते चुंबिताना अधर माझे स्वप्नी पाहिले होते - नाहिद नालबंद
काव्यरस

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 23/01/2011 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला ...॥१॥ गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते? माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला ...॥२॥ मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला ...॥३॥ पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला ...॥४॥ अरधकच्चं ग्यान लई,
काव्यरस