Skip to main content

कविता

त्याच्या पासपोर्ट साईझ फोटोचा नकाशा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 24/02/2011 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे पण फोटो नाही टाकला पासपोर्ट साईझ ..!! एकतर त्याच्याकडे फोटोच नाही असला तरी तो खूप जून वाटतोय खराब चेहरा थोडासा चकणा डोळा डोक्यावरचे उडालेले केस मस्त टक्कल पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय एक नकाशा उमटलाय शरीर अववयाचां ...!! बिन चेहर्याचा तो खूष आहे त्या फोटोवर बिन चेहर्याचा फोटो त्याला खरेच मस्त वाटतोय त्याचे सुख त्याचे दुख तो शब्दातून मांडू लागलाय एक निरागस कोवळेपण आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या नि चंद्राचा पिवळा प्रकाश मनात काहूर माजवतात तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..? नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा
काव्यरस

कान्हा

लेखक कोमल यांनी बुधवार, 23/02/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत, ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥ इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया, माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥ ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर, चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥ माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा, आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥ त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे, तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥ माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य, दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥ नाही मी राधा, अन मीरा ही नाही तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही... तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥
काव्यरस

सार्‍या जातींना खड्यात जावूद्या

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/02/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या
सार्‍या जातींना खड्यात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ|| नका कुणी हो जातपात मानू नव्या कल्पना अंमलात आणू जुने विचार मसणात जावूद्या आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१|| ह्या जातींनी काय नाय केलं माणसामाणसात भांडन लावून दिलं सख्खेशेजारी वैरी होती एकमेकांचे गळे कापती मी उच्च तू निच ते म्हणती असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा या जातींना खड्यात जावूद्या ||२|| ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार तेली तांबोळी कुणगर, महार कोळी कोष्टी कोकणा भामटा भिल्ल रामोशी मातंग बेमटा किती जात
काव्यरस

माझे आजुसचा नंगोट

लेखक आगरी बाणा यांनी बुधवार, 23/02/2011 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: ही आगरी भाषेतील हास्य कविता आहे. या कविते मधून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काहीना या कवितेत चावटपणा दिसून येऊ शकतो............!!!! माझे आजुसचा नंगोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट चार बाय चारचा हाय टेरिकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ || दिसाला चोंकोन न्यासाला तीरकोन पूरशी सरलकोट न मंगारशी बगला त भुईकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ || आजुसचे नंगोटयाव चिमन्या पोपट पुन जर का गाठ सुटली त बाला धंदाच चोपट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ || -आगरी बाणा. आगरी बोली-आगरी बाणा.
काव्यरस

पुन्हा एकदा वर्जेश सोळंकी

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 23/02/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
फार मागे वर्जेश सोळंकी या कवितेची थोडी ओळख करून द्यावी म्हणून एक धागा काढला होता : दुवा धाग्यात बर्‍याच टपला मिळाल्या. निर्व्याज विडंबनांपासून सव्याज उपहासापर्यंत सर्व दक्षिणा प्राप्त झाल्या. भरून पावलो :-) परवा याच कवीचा नवा संग्रह वाचायला मिळाला. त्याही कविता अतिशय आवडल्या. नव्या कवितांची इथल्या वाचकाना ओळख व्हावी (आणि विरोधकाना उपहासाचे नवे रान मिळावे ;-) ) या सद्हेतूने या दोन कविता देत आहे. आपल्या भल्याबुर्‍या प्रतिक्रिया जमल्यास द्याव्या.

ते अलवार नाजूक,तरल क्षण.... !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 22/02/2011 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
कशे होते ते क्षण ..? तरल अनुभव .. नाजूक क्षण..! फिरून फिरून डोकावून हरवून जातेय माझे मन ते अलवार नाजूक तरल क्षण खूप छान मस्त देखणी डोळ्यात भरून हरवून गेली एकदम मनात जाऊन बसली विसरून गेले ते मी पण छान साडी नाजूक साधी नाकी डोळी सुंदर सुंदर हरवून गेले माझे मन विसरून गेले सारे मी पण त्या नजरेचा स्पर्श मुलायम ... हलके हलके बावरून मन आभाळातील शुभ्र ढग मनास पिंजून ... मनावरून फिरून गेले ते अलवार नाजूक तरल क्षण किती काळ उलटून गेला छान दिवस हरवून गेले निळ्य निळ्या आठवणीचे अजून मला स्वप्न पडते अजून मन धुंदावून...
काव्यरस

मैत्री...

लेखक कोमल यांनी रविवार, 20/02/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री.. ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री.. अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री.. आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री.. तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री.. रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री.. परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री.. प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच.. गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री.. हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ... ही तुझी माझी मैत्री...
काव्यरस

घुबडाच्या मागे लागले कावळे हजार ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून आली कावळ्याची जीवघेणी कावकाव आंधळेपणाने दिवसाच्या प्रकाशात उडणारे वाट चुकलेले घुबड झिडपिडत टकरा खात होते भिंतीला आंधळेपणाने उडत होते कावळ्याच्या नजरेतून गहाळ होण्यासाठी जीवाच्या आकांताने जीव घेउन घाबरून वळचणीला जाऊन बसत होते माणसासारखे तोंड ,नजर ,ते नाक घाबरून आपल्यातच गुंतत होते खोल काळोख्या गुहेत कावळे पंख झापडत त्याला टोचा मारायच्या प्रयत्नात ते मिट्ट मख्ख , आपल्याच नादात त्याच्या ताकदीचा अंदाज काळोखात लुप्त अदृश्य केविलवाणा ...!! मी पाहत होतो त्याची केविलवाणी धडपड जगण्यासाठी त्याची ठाम धडपड आटोकाट .... सतराशे साठ कावळे नि ते एकटे घुबड आंधळे तरी झुंझत होते
काव्यरस

तरीही लिहा..

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 18/02/2011 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कागद म्हणतो लिहा , लेखणी म्हणते लिहा, दौतीतली शाई म्हणे लिहा लिहा अन लिहा काळजातल्या तक्रारी फुंकर मागतात, अंधारातले कोपरे उजेड मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा अवघडलेले शब्द वाटा मागतात, नेहमीच्या वाटा बदल मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा. मन म्हणते मला सुचत नाही, गाणे म्हणते तुला जमत नाही, कोणी म्हणे ताल नाही, कोणी म्हणे चाल नाही, तरीही, लिहा लिहा अन लिहा.

' सुखाचा ठेवा -'

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 18/02/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो ! तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ ! कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा ! नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला ! कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो- 'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! ' तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
काव्यरस