मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैत्रीचे गणित -

विदेश · · जे न देखे रवी...
काव्यरस
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!

वाचने 1445 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रकाश१११ 16/02/2011 - 09:52
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार वा ...मस्त !!