Skip to main content

याहो याहो पाव्हणं तुम्ही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
याहो याहो पाव्हणं तुम्ही
याहो याहो पाव्हणं तुम्ही जरा जवळ बसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||धृ|| दिवसा र्‍हाती तुमची घाई जरा बोलाया वेळच न्हाई कसं व्हाव मग मन मोकळं नका वेळ वाया घालू फुका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||१|| मी बाई राही एकटी घरात दिस सरून जाई सरेना रात सोबतीला तुम्ही याहो तग धरला कसाबसा माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||२|| थोडं मी बोलते थोडं तुम्ही बोला दिसभराची ख्याली विचारा रात आपलीच आहे विसरू नका माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०२/२०११
काव्यरस

वाचने 990
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

पाशांभेदा -किती दिवसांनी ...? दिवसा र्‍हाती तुमची घाई जरा बोलाया वेळच न्हाई कसं व्हाव मग मन मोकळं नका वेळ वाया घालू फुका देरसे आये दुरुस्त आये. मस्त !!