Skip to main content

आकाशातील मी घन काळा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 15/02/2011 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशातील मी घन काळा रोज शृंगारीत होतो मी लेऊन रंग शलाका नाही सीमा नाही बंधन नभात स्वैर फिरणारा मी मेघ-राजा पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी आज बरसून गेलो आसवांच्या झाल्या जलधारा जीवनाचा हा खेळ सारा जन्मण्यास पुनश्च देह माझा नदीसागरात विलीन झाला --------- शब्दमेघ ( २००७)
लेखनविषय:

वाचने 1194
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गणेशा -खूप अंतराने छान कविता. पण लोभ असा मज जडला प्रवास संपून गार हवेच्या प्रेमात जीव अडखळला प्रीतीत तिच्या मी जग विसरून गेलो अस्तित्वास मुकून मी आज बरसून गेलो लागे राहो. शुभेच्छा !!