माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे..
तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती
निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात,
आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...
जुनेच message जेव्हा नव्याने वाचते,
जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...
डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात,
अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात,
कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते...
आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं,
तुझ्या सारखाच न बोलता सार विसरून जायचं,
पण कस सांगू तुला ,
तेव्हा पण तुझीच आठवण अनावर असते..
एकच सांग नि एकदाच सांग,
तुला आशी अनावर आठवण कधी येतच नाही का रे??
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1719
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छाण !
कविता छान जमली आहे, त्यातील
सहमत