मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'च'

नाहिद नालबंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
'च॒' हिच्या॒त च, तिच्या॒त च ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥ च॒ळवळीत च मोर्च्या॒त च वच॒ननाम्यात च प्रचा॒रात च खुर्ची॒त च बाचा॒बाची॒त च राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥ भ्रष्टाचा॒रात च लाच॒खोरात च चा॒रा घोट्याळ्यात च जकातीच्या च॒लनात च बच॒त गटात च ब्यांकेच्या चे॒कात च चा॒लू खात्यात च पैशांशीही 'च' चे खूप छान जमते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥ च॒कलीत च च॒टणीत च चि॒वड्यात च चा॒ट मसाल्यात च चिं॒चेत च चि॒कण्या सुपारीत च जीभेच्या चो॒चल्यात च च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥४॥ चं॒द्र, चां॒दण्यात च चिं॒तनात च चि॒त्रपटात च च॒निया चो॒ळीत च च॒ड्डीत च चें॒गराचें॒गरीत च चा॒लण्यात च चु॒कण्यात च च्या॒ ऽऽ आईला च रोज एकदा तरी 'च' अक्षर भेटते 'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥५॥ -नाहिद नालबंद

वाचने 2158 वाचनखूण प्रतिक्रिया 11

आशिष सुर्वे 12/02/2011 - 21:37
चलाम चमचीतु चविताक चपखू चवडलीआ.. चहितलि चहार..

प्रास 13/02/2011 - 13:29
एकदम झकास कविता! (माझी 'च' विरहित प्रतिक्रिया)