Skip to main content

कविता

॥ पगाराचा दिवस॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल अगदी बर होत हातात पगार मिळत होता किती मिळाला पगार तिथल्या तिथ कळत होता पगाराचा दिवस तो सर्वांनाच प्यारा होता हातात पगार घेण्याचा आनंदच न्यारा होता पगाराच्या दिवशी दांडीबहाद्दर पण यायचे पगाराच्या रांगेमध्ये पुढे ऊभे रहायचे बायको पण विचारायची झाला का हो पगार? आणला आहे घरी की खेळलात सर्व जुगार मुलांना खाऊ आणायची हौस तुमची फिटली स्वतःसाठी मात्र आणली असेल बाटली आता मात्र तसे नाही ईसीएसने पगार जातो आपापल्या बँकेत खात्यावरती जमा होतो कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही

नवा जिल्बिवाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 07/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या?
काव्यरस

दोन माता

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 06/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माती आणि माता दोघिहि समान, माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या, माती देई दऱ्या ,डोंगरा आकार, माता देई पुत्र,कन्या संस्कार , माती आणि माता यास समान द्या मान , दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
काव्यरस

तू, मी अन…..!!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 05/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तू, मी अन…..!!! तप्त निखारे आणि वाऱ्याची झुळूक , रेतीमध्ये लिहिलेली धूळ त्यावर समुद्राची लाट .... …… तू, मी अन वारा .......सगळेच दिशाहीन ...!! पेटलेली शेकोटी फुललेली आग , उजेड देणारा दिवा जाळणारी मात्र वात…. ….. तू, मी आणि धरणी .....उरात फक्त धगधगणारा ओलावा… !! समुद्राला साथ ओळखीच्या किनाऱ्याची , चंद्राला त्याच्या टिपूर चांदण्यांची …. …… तू, मी आणि वाळ्वंट .....साथीला फक्त मृगजळ ....!! सुर्य फक्त प्रकाशात दिसणारा , चंद्र अंधारातही लोभसवाणा ….. ….. तू, मी आणि स्वप्न .......

शेतकर्‍याची आत्मह्त्या (फाशी)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 03/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आला सोसाट्याचा वारा गेले छ्प्पर ऊडुन। मातीच्या चार भिंती गेल्या पाण्यात बुडून॥ गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥ आली सरकारी फौज गेली पहाणी करुन। झालेले नुकसान म्हणे देऊया भरुन॥ पूर्ण झाले वर्ष एक नाही मदत पोह्चली। सावकाराच्या कर्जापाई त्याची कंबर खचली॥ झाला कर्जाचा डोंगर चिंता मनाला वाटली। खचले आत्मबळ त्याचे "फाशी" झाडाला घेतली॥

शोध....... माझा

लेखक ढंप्या यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती.... हा रस्ता दूर जातसे, परत न येण्यासाठी...... सोबतीला कोणी नसे, साथ देण्यासाठी...... पण, मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... मनात आहेत दुर्दम्य आकांक्षा, माझ्यातल्या मी साठी...... कोणी साथ द्या, अगर नका देउ...... मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... माझ्यातल्या मी साठी......

संकल्प

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु हा अंतिम नाही ,नंतरही करता येते बरेच काही, करोनी डोळे दान अंधांची वाढवावी शान, कुणा द्यावे चाम ,जळलेल्या चे होईल काम, किडनी द्यावी कुणा,आयुष्य जगेल दुणा, दान करोनी वेगवेगळे भाग,वाचवावे जिवलग, करोनी शरीर दान मेल्यावरही व्हावे महान , करा मनाचा कायाकल्प ,धरा मनी देह दाना चा संकल्प.
काव्यरस

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

त्रेधा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक श्वासात ध्यास मज बिलगुन आहे राधा नसून भासे सोबतीस ठायी ठायी ही बाधा .............. स्वरे कोकिळा गाई वसंत ................अनाम सार्‍या विविधा ................मदन गंध पवनासंगे ................एकांती कुंठित मेधा खोल निळाई अथांगासवे क्षितिज बांधते वाडा जन्म सांडतो संमोहातच धाव धावतो वेडा .................वलये वलये लाटा लटा .................मनभर तिरपिट त्रेधा .................काय कशास्तव हे भिजलेपण .................सय-श्रावण सण साधा ......................अज्ञात
काव्यरस

॥पक्षिणीचे प्रेम॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 01/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी निवांत, बसलो होतो सोफ्यावर । अचानक नजर गेली , चिमणीच्या खोप्यावर॥ तिची ती दोन पिल्ले , चिवचिवाट करत होती । चिमणी ही मोठ्या प्रेमाने, त्यांना दाणे चारत होती ॥ तितक्यात घरत लक्ष गेले..... माझी ही दोन मुले, रडुन रडून सांगत होती। खाण्यासाठी आईकडे, कहीतरी मागत होती ॥ घरात होते सर्व पण, झोळी तिची खाली होती। कामावर जाण्याची, घाई तिला झाली होती॥ करिअर व पैशापुढे, आईचे ते प्रेम विरले। माणसाच्या प्रेमापुढे, "पक्षिणीचे प्रेम" श्रेष्ठ ठरले॥