Skip to main content

कविता

ट्रेफिक सेन्स

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 29/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सखे पाहून तुज साडीत लाल, थांबलो,जाहलो मी बेहाल, पाहून तनास हळद पिवळी, सावरलो नजर झाली बावळी , पाहून हातात चुडा हिरवा, भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा, चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

तू

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 29/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या थेंबासारखी तू . पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या पाण्यासारखी तू . पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या प्राजक्तासारखी तू . कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या दवथेंबासारखी तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू . सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू . मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या सोनगुपितासारखी तू .... तू, तू आणि तू ... सांग गं सखे, हो तूच तू कुठे नाहीस? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०४/२०१३)

जीवनाचे कोडे

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 28/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे
काव्यरस

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 27/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे ये
काव्यरस

राशी चक्रम

लेखक राजा सोव्नी यांनी शुक्रवार, 26/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला , वृश्चिक पाहुनी कन्या पळती , कर्क,मीन,कुंभात दडती , धनु पाहुनी मकर विचलित होतो, मिथुन जना आनंद
काव्यरस

प्रवास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 25/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास चालू आहे माझा शून्याकडून क्षितिजाकडे . . अथक, अविरत . . थांबता नाही येणार मला खूप थकलोय, पण थांबलो तर मन रागावेल आणि पाय तर चालायला नकार देतायत जाऊन जाऊन कुठे पोहोचणार? क्षितीज तर एक रेघ.. आणि शून्य? ते काय? सुरवात केलेल्या बिंदुला गोल फिरून पोहचणारी एक वळसे घेणारी रेघच ना? . . मग का चालावे? पण मन, ते का ऐकत नाही? मनालाच ठाऊक विचारले जरी सांगता थोडीच येणार आहे त्याला? आणि सांगितलेच तरी कळणार कोणाला इथे? जाऊ दे त्यापेक्षा हा प्रवास काय वाईट आहे? चालू ठेऊया शून्याकडून क्षितिजाकडे . अथक, अविरत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०५/२०११) (हो, साधारण दोन वर्षांपूर्वी लिहीलेली हि कविता आहे.)
काव्यरस

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

नट्यांचे रहस्य

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 24/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या , मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या, एकमेका करती सेलफोन, आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण? देवांना घातली त्यांनी आण , स्वर्गात नाही अप्सरांचे वाण , नका आणू स्वर्गात एकाही नटीला, पोचल्या असल्या जरी साठीला ,
काव्यरस

भेटलाच कधी.....

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 24/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......। "भक्ती" म्हणजे काय असते ? देवाचे स्वरुप हे चरचरात असते कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥ भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......। "ज्ञान" म्हणजे काय असते ? सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥ भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......। "वैराग्य" म्हणजे काय असते ? सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥ भेटलाच कधी शिवाजी तर विचारा त्याला....। "सामर्थ्य" म्हणजे काय असते ? प्रजेच्या दुखःची जाणीव अंतरी झाली यवनांशी युध्द करून स्वराज्याची स्थापना केली ॥ भेटलीच कधी अन

शोध

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 24/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.