Skip to main content

कविता

अशीही आणि तशीही

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 22/03/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म देता देता जन्म घेणारी शब्द नि अर्थ जुळवणारी उंचच उंच गर्दीमध्ये बोट घट्ट धरणारी चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू गिरगिर, भिरभिर.. खुलणारी कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी कधी अंग चोरून बसणारी नको असतानाही असणारी काही आयुष्यभर दिसत, भासत हुलकावणी देत राहणारी उणे अधिक मांडता मांडता हातचा म्हणून राहणारी अन् ती.. आभाळागत सदैव जागी फक्त नजरेत सामावणारी जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती!

बुर्खा

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 21/03/2013 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
हरेक माणूस नागमोडी कुणीच नाही सुतासारखा सुरी तयाच्या बगलेमध्ये जरी दिसे हा दुतासारखा ! बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या हरेक किस्सा मृतासारखा गळ्यास येता : विचारवंत बनून जातो बुतासारखा ! मृदेत किल्ला कशास बांधा विरून जातो मुतासारखा.. फिरून व्योमी तिथेच येतो जन्म असा हा भुतासारखा ! - (C) डॉ.सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_21.html

बटाटा

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 20/03/2013 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा उरतो केवळ मी बटाटा उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी सान-थोर सर्वांस भावतो मी गाव-शहर असो पाऊल-वाटा सर्वत्र दिसतो मी बटाटा पार्टी असो वा उपास करती जन माझा तपास गोड अथवा तिखट कुरकुरीत वा चिवट परिस्थिती असो बिकट असतो मी सदैव निकट असा मी बटाटा
काव्यरस

सीमारेषा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/03/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...
काव्यरस

भावओली

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 20/03/2013 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ? कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ? दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली ..............................अज्ञात
काव्यरस

कवितेचे शिर्षक आहे: मिठी

लेखक जोशमनिष यांनी मंगळवार, 19/03/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर क्षण, अस्थिर मन द्यावे झोकून, तुझ्या मिठीत गुंतता हृदय, निष्काम प्रेममय अविरत लय, तुझ्या मिठीत अनावर प्रीती, ओढ सांगाती प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत श्वास गुंफले, द्वैत सरले भानही नुरले, तुझ्या मिठीत काहूर थमले, मन सावरले मेघही बरसले, तुझ्या मिठीत आधार भावनिक, बळ आत्मिक आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत

घराच्या उंब-याला सांग फिरुनी

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 19/03/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या उंब-याला सांग फिरुनी घराच्या उंब-याशी थांब फिरुनी पुन्हा ती ओळखीची रात येता तिला सोडून येते लांब फिरुनी किती चालून गेले वाट वेडी खुणेचा येतसे का खांब फिरुनी मनी गर्दी कशाला आठवांनो इथे ना हासरी ती रांग फिरुनी थवे गं दाटले या आसवांचे जराशी काजळा तू पांग फिरुनी (*पांगणे) - संध्या १९ मार्च २०१३

आई..बाबा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/03/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा ......... काल आवरताना बाबांचे जुने रोलेक्स घड्याळ सापडले. एकदम आठवल....म्हणायचे आमच्याशी बोलण्या साठी तुला कधी वेळ मिळणार देव जाणे ... ............................. आई शनिवार ची सकाळची शाळा.. डोळ्यावर झोपेची झापड पटकन उरकलेली आंघोळ. खाकी चड्डी व पांढरा शर्ट पोळीचा लाडु..कडीचा डबा.. एकदम लहान पण आठवते.. व आता हयात नसलेली आई पण..

आई शप्पथ सांगतो...

लेखक यसवायजी यांनी रविवार, 17/03/2013 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला.. बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती??? A ---------------------------------------------- तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :( तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

दिवे देत नाही

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 16/03/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही - संध्या अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती. अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे.