Skip to main content

कविता

असही तसही....

लेखक निश यांनी बुधवार, 17/04/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी दाढी करता करता टिव्ही चालु केला बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या फार फार वाईट वाटल ते बघुन बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन. दुपारी जेवताना परत टिव्ही लावला बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्‍या जनावरांची. मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न टाकायला कचर्‍याच्या डब्ब्यात. रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो. मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला. मनात परत ऐकदा दुखावलो, मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या. फोटो कसला पाठवतो लाईक करायला , त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें. मी मात्र हाकलल त्या

आई

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 17/04/2013 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आयुषभर कष्ट करुन जिने तुला वाढवल । आयुष्याच्या संध्याकाळी तिलाच तू रडवल॥ध्रु॥ चिऊचा काऊचा घास करुन, जिने तुला भरवल । कड्या खांद्यावर घेऊन तुला, गावभर फिरवल । माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून, गावभर मिरवल । नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल...॥१॥ अनंत कळा सहन करून, तुला हे जग दाखवल । चिमुकल्या बोटला धरुन, चालायला शिखवल । खोकला येताच तुला, मधाच बोट चाखवल । तळहाताच्या फोडप्रमाणे जिने तुला वाढवल...॥२॥ तुझ्यासाठी तिने आपल, रक्त आटवल । शिक्षणासाठी तुला, चांगल्या शाळेत पाठवल । जीवनभराच दु:ख , आपल्या पोटात साठवल । स्वतःच्या स्वप्नांना तिने पायदळी तुडवल...॥३॥ सगळेच काय अगदी, श्रावण किंवा पुंडलीक नसतात। ज

हुंकार

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 15/04/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द शब्द, हुंकार मनाचे ओले किनारे, खार्‍या पाण्याचे काळजाचा साचा, उघडून वाचा श्वास बाळाचे, ध्यास मायेचे वळणांचा घाट, वारा मोकाट सारे सारे कांही, होते आट पाट आलेली पहाट, पावलांची वाट आईची सय करते, साय घनदाट ...........................अज्ञात
काव्यरस

॥ अज्ञान ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 14/04/2013 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
तिर्थयात्रा सर्व करुन आली । परी देवाची भेट नाही झाली । वेळ आणि अर्थिक वाया गेली । व्यर्थ तुझी ही काया झिजवली । देव नाही हो कुठे तिर्थस्थानी । जेथे जावे तेथे धोंडा-पाणी । धंदा मांडला तेथे पुजार्‍यांनी । पावतीविना सोडिना आत कोणी । देवा नाही हो गिरी कपारीत । तो आहे आपल्याच ह्रुदयात । शोधा त्याला आपुल्याच घरात । आईवडिलांच्या शुध्द स्वरुपात । आला आजार भगताकडे गेला । लिंबू देऊन चमत्कार केला । राख ताबीत घेऊन घरी आला । काय म्हणावे ह्या अज्ञानाला । अस्वलाच्या एका केसावरी । म्हणे सामर्थ्य आहे तेथे भारी । ते अस्वल असते त्याच्या करी । मग तो का हिंडतो दारोदारी । कोणी काढती फुले हातातुन । कोणी काढती स

वृक्षारव

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 12/04/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका पवनाचे हुंकार झेलतो जरी कधी असतो तो धोका .........................अज्ञात
काव्यरस

पाळ्णा

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 11/04/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा सण पहिला । गुढी उभारुन साजरा केला । नविन वार्षास प्रारंभ झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ दुसरा सण व्यासपौर्णिमा । सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा । त्रीजगती नाही उपमा । ये श्री दत्ता ये ये ॥ तिसरा सण पंचमी आली । नागराजाची पुजा ही केली । झोका खेळाया जमल्या मुली । ये श्री दत्ता ये ये ॥ चौथा सण रक्षाबंधन । भाऊरायाला राखी बांधीन । आई बाबांना प्रथम वंदन । ये श्री दत्ता ये ये ॥ पाचवा सण गोपाळ काला गोप्गोपींचा मेळा जमला हांडी फोडण्या त्वरे निघाला ये श्री दत्ता ये ये ॥ सहावा सण श्रावण पोळा । बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा । शेतकरीदादाला आनंद झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ सातवा सण गणे

बाजारभाव (४-११-२००९)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 10/04/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा महगाईचा विषय होता साधा आणि सोपा काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले बारा रु.पाव किलो वांगी व कारले फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ भडकलेले होते हरभरे आणि वाल साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला तेलाचा डबा पण किती महाग झाला दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर विचारायलाच नको चीज आणि बटर सगळीकडेच भडकली अशी ही महागाई

एकटा

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 08/04/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा , नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा, पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट , पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ, कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.
काव्यरस

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2013 19:29 या दिवशी प्रकाशित केले.

मगर

प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी 'मगर' हा अश्रु ही ढाळीत होता.

मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

संमोहरमल

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 07/04/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी .....................अज्ञात
काव्यरस