Skip to main content

कविता

कबुतरांची सभा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/05/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वा एका सरकारी हापिसात कामासाठी गेलो होतो आणी नेहमी प्रमाणे वाट बघत ताटकळत उभा होतो. कडेला वाटलं माणसं बोलताहेत पण कबुतरं बोलत होती कालच्या दिवसात काय काय झालं? याचे हिशेब तोलत होती पहिलं दुसर्‍याकडे पाहुन मिष्किलपणे हसत होतं आणी त्यांच्या गमती पाहुन तिसरं मधिच घुसत होतं काल म्हणे पहिल्याला आख्खं कणिस मिळलं पण दुसर्‍यानं धक्का दिला आणी ते हवेतच गळलं थोड्याच वेळात कबुतरांची भली मोठ्ठी सभा भरली आणी आज चरायला कुठं जायचं? यावरच पहिली चर्चा ठरली कुणी म्हणलं किराणा दुकान आजचा पहिला ठराव आहे धान्यात दगडं-खायचा तिथं चांगला सराव आहे. दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन कशाला मोकळं सोडायचं? पण त्या बेन्
काव्यरस

स्व्प्न

लेखक दिपक वायळ यांनी रविवार, 05/05/2013 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा ती माझ्याकडे आली माझ्या बरोबर चल म्हणाली हो म्हणायच्या आतच ती पकडुन हात घेउन गेली होतो सोबत आम्ही चालत कधी शांत कधी बोलत पायवाट निळसर न्व्हती संपत नभी चांदणे, चंद्र सोबत गोड गप्पा न्व्हत्या संपत सुरेल आवाज जणू कोकिलेगत मना मध्ये भासे दिव्य संगत नकळ्त सूर बासरीचे उंमलत हसताना ती बाहूली दिसायची बारिक डोळे मउ मउ गाल गालावर खळी नाजूक पडायची नयन शिंपल्यात जपावी वाटायची तरु तळी एका आम्ही बसलो मनीचे सारे तिला मि वदलो शब्द थरथरले माझे ओठात परी नजर थेट डोळ्यात हे "स्व्प्न" सारं पून्हा आठवायचं नाही झालो जागा तरी उठलो नाही खरंच विचारात पड्लो मी प्रेमा मध्ये तर पडलो नाही

बुफे,अथवा खड भोजन

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 04/05/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा , आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा , भोजनासी गर्दी झाली भारी , करती पहा कैसी मारामारी , गर्दी करती अन्ना भोवती , जैसी गिधाडे भक्षा भोवती , कोणी करेना कोणाची पर्वा , भ
काव्यरस

धरण उषाला कोरड घशाला

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 03/05/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत हांडाभर पाण्यासाठी आम
काव्यरस

नाचते नार तोऱ्यात -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/05/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
. नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची .
काव्यरस

आस

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 02/05/2013 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मन नाही नाही म्हणते पण हृदयात आस घन कळवळते दरवळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते गोकुळ स्वप्नांची सलगी जिरवून कथानक वावरते तापल्या काहिली तृप्त माळभर धुंधुर माया हिरवळते ओठात शब्द स्वर कंठातिल भावना लास्यमय ओघवते आशेस किनारा वाळूचा दर्पणी कामना विरघळते ....................अज्ञात
काव्यरस

प्रवास वेगळाच घडला…

लेखक मनिष यांनी बुधवार, 01/05/2013 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा हात सोडला अन् प्रवास वेगळाच घडला मी मृगजळाचा नाद सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. तुझीच शक्ती, तुझीच भक्ती; हिच इथली वहिवाट मी हा शिरस्ता मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट, मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. माझे प्राक्तन, माझीच दृष्टी अन् माझेच हे दोन हात मी अट्टहास फळाचा सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. फाटलेले शीड, वादळाची साथ अन् संकटांची लाट पण हा कणा नाही मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला. मुक्कामही विसरलो, अशी सापडली

समृद्ध भारत

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची समृद्धी रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते, पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत , आता स्टील ची लोटी दिसते
काव्यरस

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

दृष्टी दोष

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 30/04/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
बदलली नजर तुझी लेन्स लावूनी, हसत होतीस त्या आधी मला बघोनी, नयनात तुझ्या सदा मी होतो आधी , जडली कशी तुज नजरेची व्याधी लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,
काव्यरस