सकाळी सकाळी निवांत,
बसलो होतो सोफ्यावर ।
अचानक नजर गेली ,
चिमणीच्या खोप्यावर॥
तिची ती दोन पिल्ले ,
चिवचिवाट करत होती ।
चिमणी ही मोठ्या प्रेमाने,
त्यांना दाणे चारत होती ॥
तितक्यात घरत लक्ष गेले.....
माझी ही दोन मुले,
रडुन रडून सांगत होती।
खाण्यासाठी आईकडे,
कहीतरी मागत होती ॥
घरात होते सर्व पण,
झोळी तिची खाली होती।
कामावर जाण्याची,
घाई तिला झाली होती॥
करिअर व पैशापुढे,
आईचे ते प्रेम विरले।
माणसाच्या प्रेमापुढे,
"पक्षिणीचे प्रेम" श्रेष्ठ ठरले॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1391
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
+१
In reply to :-) by आतिवास
मुलांना खाऊ तर मी देईल हो; पण
मग बाबांचं द्या ! चालवून
In reply to मुलांना खाऊ तर मी देईल हो; पण by Bhagwanta Wayal
भावना पोहोचल्या..
चिमणीच्या खोप्यावर॥