Skip to main content

कविता

वना चे श्लोक

लेखक राजा सोव्नी यांनी गुरुवार, 28/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
।। सदा सर्वदा वनी विचरावे ।। ।। वना जोपासण्या सदा सिद्ध व्हावे ।। ।। वना राखण्या संकल्प जीवी ।।।। ।।वना तोडण्या संकल्प सोडूनी द्यावा ।। ।।वनी वृक्ष वल्ली सदा वाढू द्याव्या ।। ।।मनी वृक्ष वल्ली सदा पुज्य व्हाव्या ।। ।।वनी वनचरे सदा वाढू द्यावी ।। ।।मनी वनचरे सदा आदरावी ।। ।।तना जाळण्या वृक्ष तोडू नकोरे ।। ।।तना जाणण्या देह दान करारे ।। ।।वना सारखा मित्र कोणीही नाही ।। ।। वना वाचुनी दुखः ठाई ठ
काव्यरस

रात्रीच्या पावसाने

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 28/03/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा
काव्यरस

ग्रेस ...

लेखक शतदाप्रेमकरावे यांनी गुरुवार, 28/03/2013 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू देउन गेला जाता दु:खाचा निळासा भार स्वप्नांच्या वाटेवर दाटला गडद अंधार हे जगणे अडले येथे तू जेथे सोडली साथ ... चाचपडत शोधतो आहे सुखाचा मोडका हात ! -अनिल बिहाणी. कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

रंगुनी रंगात मधुर.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 27/03/2013 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंगुनी रंगात मधुर............ दिन रंगांचा आजला कल्लोळ भावनांचा उरी, रुसलीस तू, खुलवींन मी आज उधळूनी रंग तुजवरी !. विरतिल गडद रंगांत ह्या राग रुसव्याच्या खुणा, उरतील मागे पुन्हा प्रेम स्नेहाच्या पाऊलखुणा ! विविध रंग घेउन सवें पोहोचलो द्वारी तुझ्या, बावरली तू गोड अईसी फुलले गुलाब गालीं तुझ्या ! ढळला पदर, आरक्त मुखचन्द्रम़ा, स्मितबरसात इन्द्रधनुसम भासली,
काव्यरस

अर्धा पूल…..

लेखक फिझा यांनी मंगळवार, 26/03/2013 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सगळं मिळवूनही प्रत्येक जण संपूर्ण समाधानी नसतोच ....शेवटी शेवटी मोक्ष मिळावा असे वाटते ........तो मिळाला तरी .....समाधान कुठे असते ............. अर्धा पूल….. धुसर होत जाणारा एक मोठा पूल … अत: पासून इति पर्यंत .... या जगापासून त्या जगाला जोडणारा असेल कदाचित ..... इकडून अर्धाच दिसतो ....पुढे फक्त धुके .... ......

रक्तरंग

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 25/03/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
12 मार्च 1993 ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटां नंतरच्या होळीच्या दिनी .......................... रक्तरंग सांजराती पेटली होळी भिडल्या ज्वाला गगनाला, याद जाहली विस्फ़ोटाचि भड़कत होत्या अशाच ज्वाला ! एक एक त्यांत तनू कोसळल्या आयुश्याशी तोडून नाती, पति-पत्नी अन आई बाबा जाहली पोरकी सगळी नाती ! आज रंगाच्या पिचकाऱ्या भासती रुधिराच्या चिळकांड्या परी, भळभळणारे रक्त आठवून आतंकाची तिडिक अंतरी !

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/03/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

लेखणी !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 25/03/2013 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखणी !! तिला असेल आठवण आपल्या शेवटच्या भेटीची अंतर पडण्याआधी लिहिलेल्या जवळच्या शब्दांची तिही विचारत असेल तुला ... काही लिहीशील का आज माझ्यासाठी ...!! भिजलो एकदाच पावसात ...डोळेभरून ... परत भिजलास का रे कधी ... भेटलो नेहमी त्याच वाटेत ...नजर टाळून ..

' रक्तरेषा '

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 23/03/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
' रक्तरेषा ' वेळीअवेळी आकाश नुसतेच भरून येते एकदाचे हमसून बरसत नाही. लेखणी कुंद कुंद : नुसतीच ठिबकते ; झरत नाही. रक्तरेषा : उभ्या, आडव्या, तिरप्या भावनेच्या भरातले अर्धेमुर्धे वार कागदाच्या पोटात धारदार .. असे स्वतःचेच कैक खून वेळीअवेळी...! डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_22.html