Skip to main content

कविता

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस

॥स्तवन धरणीमातेचे ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 22/04/2013 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली । शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला । एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी । सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला । सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते । स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला । गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा । भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला । उत्तम बीजे सुपिक माती । अन्न धान्य ही विपुल होती । जीवन देते सकळ विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला । कितेक धातु लहान मोठे । तेलाचेही अनंत साठे

आषाढी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/04/2013 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही ..............................अज्ञात
काव्यरस

वसंत ऋतू आला -

लेखक विदेश यांनी सोमवार, 22/04/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी तू ओले केस फटकारत असताना आरसाच दिमाखात असतो पुडीतून हळूच डोकावणारा मोगरा प्रसन्न हसत असतो स्वत:शीच मान डोलावत खिडकीतून डोकावणारी अबोली काहीतरी पुटपुटत असते मनातल्या मनांत छानसे मिठी मारल्यागत लाजाळू तुझी पाठ पहात खुदकन लाजलेले असते आरशासमोर दोन गुलाब उमलत चाललेले मला दुरूनही दिसतात ओठावरचे निसर्गदत्त डाळिंबाचे दाणे पिळवटून ओठावर पसरायला पहातात दोन भुवयांच्या कमानीत जास्वन्दीचा लालभडक ठिपका विराजमान होत असतो पावडरच्या कणाकणात जाईजुईचा मंद सुगंध अहाहा, चेहऱ्यावर पसरतो हिरव्या साडीचोळीतले अनोखे रूप मनाची घालमेल वाढवते माझ्या कवितेतला वसंत बहरलेला असतो उन
काव्यरस

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

स्वप्नांची शाळा

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 21/04/2013 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती, दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी, ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा , घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर , दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा, झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक , आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या, मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती, गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
काव्यरस

मेळ घाट

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 20/04/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनी आठविते भय रात्र मज ती,कोणी न्हवते अवती भवती, त्यातून बिबट्याची डरकाळी ,मेळ घाटातली ती रात्र काळी, रान गव्यांचे हुंकार भिवविती ;वानरांचे चित्कार घुमती, हरीणांचे बिथरून पळणे ,रस्त्यांची ती अद्भुत वळणे, पहाट होता किलबिल होते,मनावरचे दडपण जाते, पहाट किती रम्य वाटते,झाड -फुलांना शोभा येते, भयाची जागा हुशारी घेते,निसर्ग त्याला साथ देते.
काव्यरस

सुप्रभात -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/04/2013 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा छान सजली आज दारी नक्षिची रंगावली पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा .
काव्यरस

भुलैया

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 18/04/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मन धावे....... मन धावे...... पालवी नवी अंगावरती ओलावे... ओठात नवे जीवनगाणे.. वाटे गावे... मन धावे... मोकळ्या दिशा आकाश कडेवरती,.. वाकुन बोलावे ओणवे मेघ मल्हार कधी अमृत घन पान्हावे... साकेत अंगणी पुष्करिणीसह दान पसा पावे... मन धावे... साधार कल्पना स्वप्न अकल्पित दावे... जे काय हवे ते हृदयी भावे..... संकेत संगमी, रंजन संगर भुलवे... मन धावे...... मन धावे..... .....................अज्ञात
काव्यरस

असही तसही....

लेखक निश यांनी बुधवार, 17/04/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी दाढी करता करता टिव्ही चालु केला बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या फार फार वाईट वाटल ते बघुन बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन. दुपारी जेवताना परत टिव्ही लावला बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्‍या जनावरांची. मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न टाकायला कचर्‍याच्या डब्ब्यात. रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो. मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला. मनात परत ऐकदा दुखावलो, मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या. फोटो कसला पाठवतो लाईक करायला , त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें. मी मात्र हाकलल त्या