एका अनावर कैफात

लेखनविषय:
काव्यरस
एका अनावर कैफात लिहिली होती ती कविता नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत? मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली तेव्हा थोडी भुंडी पण थोडी खरीही वाटली ती कविता नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत? मग कापलं सपासप - वायफळ शब्दतण तेव्हा जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली ती कविता नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ? मग खोडायला गेलो दोन चार ओळी तेव्हा ओळीतल्या रिकाम्या जागेतून सण्णकन फणा काढत जिव्हारी डसली ती कविता

प्रेरणा वगैरे

लेखनविषय:
'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....' असं काही नसतं गं कारण तू जवळ असताना मला कविता लिहावीशी वाटणं हा तुझा अपमान तरी आहे . . . किंवा पराभव तरी....

( पुन्हा नोटा )

नोटा (चाल : गे मायभू तुझे मी) नोटा अनेक असती येती तुझ्याकडे त्या मी नोट शोधतो माझी परक्याच भासती साऱ्या दूरस्थ योजना* त्या खुणवी सदा मनाला मी गुंतवित जाता बुडतात घेऊनि मजला मागावयास जाता देती कुणी न काही नोटांनी भरले पाकिट मी स्वप्नी रोज ते पाही * योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"

भावगीत

लेखनविषय:
( धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.. ह्या भावगीताच्या चालीवर म्हणता येते.) दोन जीवांची इथे भेट झाली रात्र सारी आज चांदण्यात न्हाली ||धृ || तुला पाहता मन हे मोहरले तुझे माझे नेत्री शब्द अश्रूरूप झाले शब्दावीण संवाद अंतर्यामी झाला तुझे माझे मनी आज अनुराग झाला ||१ || तुझे लाजणे ते अन् हसून बघणे मोग-यांचे गजरे केसांत गं माळणे तुझ्या स्पर्शाने तनु रोमांचित होई तुझा आणि माझा श्वास एकरूप होई ||२ || तुझे माझे नाते चिरंतन राहो प्रेमभाव आपुल्या मनी वृद्धिंगत होवो एकमेका साथीने जीवन जगणे शरीरे वेगळी मन एकरूप होणे ||३ || कवी आणि गीतकार : वैभव दातार भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

हिरवे सोने

लेखनविषय:
काव्यरस
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी

वाटा

लेखनविषय:
काव्यरस
वाटा वाटा कितीक असती येती तुझ्याकडे ज्या नाहीच एकही माझी परक्याच वाटती साऱ्या दूरस्थ तूही तेथे ठाऊक पाहसी मजला ओठांवरी तुझ्या ही वसलेला तोच अबोला वाटे परंतु तरीही बोलणार कुणीही नाही निःशब्द भावनांना आभाळ साक्षी राही पद्मश्री चित्रे 24102017

( काल रातीला सपान पडलं )

हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

निवडुंग तरारे इथला....

लेखनविषय:
लेखनप्रकार
In Flander's Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते. ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....
Subscribe to कविता