मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसा फुलताना दिसू?

चांदणे संदीप · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

वाचन 4162 वाचनखूण प्रतिक्रिया 15

खुप अर्थपुर्ण आहे कविता.... आवडली.... फक्त तिसऱ्या कडव्यात "चिरत मला गेलेली" ऐवजी "मला चिरत गेलेली" असे मी वाचुन पाहिले तर ते अधिक छान वाटले.... बाकी उत्तमच आहे....

चांदणे संदीप Sat, 11/19/2016 - 11:12
पैजारबुवा, शार्दूल, कमा, बुवा, वल्ली, जव्हेरभाऊ, भाग्यश्री, प्राची अश्विनी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!! Sandy

यशोधरा Sat, 11/19/2016 - 11:30
पहिली ३ कडवी आवडली. शेवटच्या कडव्यात तुला मिळालेला कोरा, चकाकणारा आईना.. असे करुन पाहिले. तो वगैरे फिलर्स वापरायची मग गरज लागणार नाही असे वाटते. चुभू.

नाखु Mon, 11/21/2016 - 08:59
शेवटचा आईना तर एक्दम जबराट आहे. आईना का बाईना वाचल्या बिगर राहिना वाला नाखु